Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट; भरकार्यक्रमातच दिली खुनाची खुली ‘ऑफर’

सुमारे दीड महिन्यापूर्वी मनीषा नातेवाईकाच्या लग्नासाठी कन्हान येथे गेली होती. तेथे गणेशने सर्वांसमोर मारहाण केली. संतापाच्या भरात मनीषाने जो कोणी गणेशला ठार मारेल, त्याला एक लाख रुपये देईन, अशी जाहीर घोषणा केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 04, 2026 | 09:27 AM
पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट

पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट

Follow Us
Follow Us:

नागपूर : भांडेवाडी येथील हनुमाननगर परिसरातील रहिवासी गणेश उर्फ गुरुदेव बोरकर (वय ४५) या व्यक्तीची रेल्वे स्थानकाजवळ धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. याप्रकरणाच्या तपासात घरगुती हिंसाचार, सातत्याने होणारी मारहाण आणि मुलींवर असलेल्या वाईट नजरेला कंटाळून पत्नी मनीषा बोरकर (वय ३७) हिने पतीच्या हत्येसाठी एक लाखाची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मनीषा बोरकर आणि साथीदार दादू ऊर्फ अभिजित साखरे (वय २७, रा. कान्हान) याला अटक केली. हत्येत सहभागी इतर आरोपींचा शोध सुरू आहे. गणेशविरुद्ध डझनभर गुन्हे दाखल होते. पोलिसांच्या तपासानुसार, मनीषाने १४ वर्षांपूर्वी गणेशसोबत दुसरे लग्न केले होते. तिला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. गणेश पत्नीसह दोन्ही मुलींचाही छळ करत होता. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी त्याने मनीषाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तुरुंगवासही भोगला होता. जानेवारीमध्ये तो तुरुंगातून सुटल्यानंतरही मनीषावर पुन्हा त्याच्यासोबत राहण्याचा दबाव टाकत होता.

Raja Raghuvanshi Case : सोनम रघुवंशीला पुन्हा तुरुंगात पाठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; 10 जुलैला पुढील सुनावणी

मनीषाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गणेशची दोन्ही मुलींवर वाईट नजर होती. त्यामुळे ती मुलींना घेऊन वेगळ्या भाड्याच्या घरात राहू लागली. मात्र, परत न आल्यास ठार मारण्याची धमकी गणेश तिला सातत्याने देत होता.

ठार मारणाऱ्याला एक लाख देईन

सुमारे दीड महिन्यापूर्वी मनीषा नातेवाईकाच्या लग्नासाठी कन्हान येथे गेली होती. तेथे गणेशने सर्वांसमोर मारहाण केली. संतापाच्या भरात मनीषाने जो कोणी गणेशला ठार मारेल, त्याला एक लाख रुपये देईन, अशी जाहीर घोषणा केली. लग्नात कांद्री कान्हान येथील दादू ऊर्फ अभिजित साखरे आणि मित्र अमन ऊर्फ नाटो पप्पू कैतवार उपस्थित होते. त्यांनी सुरुवातीला पती-पत्नीतील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच गणेशच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.

दागिने गहाण ठेवून दिली सुपारी

अमनने मनीषाशी संपर्क साधून गणेशला संपवण्याचा प्रस्ताव दिला. त्यास मनीषाने होकार दिला. सुपारीची रक्कम उभी करण्यासाठी तिने दागिने गहाण ठेवून अमनला ५० हजार रुपये आगाऊ दिले. मंगळवारी रात्री अमनने दोन साथीदारांसह गणेशचा पाठलाग केला. संधी साधून आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली. तपासादरम्यान पोलिसांनी मनीषा आणि दादू यांना अटक केली. चौकशीत मनीषाने हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. फरार अमन कैतवार आणि इतर साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Nagpur crime crime news nagpur news wife murder husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
1

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

नागपुरात 28 वर्षीय तरुणीची हत्या; दागिन्यांच्या पेटीत शस्त्र, लाल साड्या, फुग्यांची सजावट अन्…
2

नागपुरात 28 वर्षीय तरुणीची हत्या; दागिन्यांच्या पेटीत शस्त्र, लाल साड्या, फुग्यांची सजावट अन्…

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ
3

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
4

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.