Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: ‘मला वाचवा…’ म्हणत आईला फोन, काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह कबरीतून काढले बाहेर आणि…

नागपूरमध्ये 19 वर्षीय नवविवाहिता फाजीला जबीन शेख हिचा संशयास्पद मृत्यू झाला. सासरच्यांनी हार्ट अटॅकचा दावा केला होता. मात्र कबरीतून मृतदेह बाहेर काढून केलेल्या पोस्टमार्टममध्ये गळा दाबून हत्या झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी पती आणि दिराला ताब्यात घेतले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 20, 2026 | 12:25 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • नवविवाहितेच्या मृत्यूमागे हुंडाबळीचा संशय
  • पोस्टमार्टममध्ये गळा दाबून हत्या झाल्याचा खुलासा
  • पती आणि दिराला पोलिसांनी घेतले ताब्यात
नागपूर: एक हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात नवविवाहिता फाजीला जबीन शेख (वय 19) असे पीडित महिलेचे नाव आहे. हिचा मृत्यू झाल्याच्या समोर आले आहे. हिचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून तिचा पोस्टमार्टम करण्यात आला. त्यानंतर तिच्या मृत्यू मागचे गुड उलघडले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले आहे. मात्र तिच्या सासरच्यांनी हार्ट अटॅक ने मृत्यू झाल्याचा बनवला रचला होता.

काय घडलं तिच्यासोबत नेमकं?

फाजीला जबीन शेख (मूळ अमरावती) हिचा विवाह याच वर्षी जानेवारी महिन्यात नागपूरच्या बोरिया पुरा परिसरातील जुबेर शेख याच्यासोबत. सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित होतं. मात्र काही दिवसांनी हुंड्याच्या मागणीवरून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

Police Attack Tasgaon: तासगावात पोलिसांवर दगडफेक! मंदिर चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पथकावर हल्ला

14 मे रोजी फाजीला ने आईला फोन करून रडत रडत ‘मला वाचवा… माझ्यासोबत काहीही होऊ शकतं’ असं सांगितले होते. यानंतर काही वेळातच तिचा फोन बंद झाला. त्यानंतर काही वेळात सासरच्या मंडळींकडून फाजिलाचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती देण्यात आली. फाजीलाची आई वडील नागपुरात पोहोचले. सुरुवातीला सासरच्यांनी मृतदेह देण्यास नकार दिला असा आरोप करण्यात आलाय. मात्र नंतर मृतदेह अमरावती येथे देण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान घालत असताना फाजीलाच्या गळ्यावर जखमेचे निशाण दिसून आले. त्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याचा संशय माहेरच्यांना आला.

फाजीलाचा भाऊ मोहम्मद आवेश अब्दुल हसन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर मुतदेह कबरीतून बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात गळ्यात आपल्याने मृत्यू झाल्याचे पुष्टी झाली आहे. त्या आधारे नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 238, 351 (2), आणि 3(5) या अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पती जुबेर शेख दीर मोहम्मद इरफान आणि सासरे जलील शेख यांना आरोपी करण्यात आले आहे. तर पोलिसांनी पती आणि दिराला ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात. आणि वृद्धापकाळमुळे सासऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही.

या घटनेने पुन्हा एकदा हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. लग्नानंतर महिलांवर होणारा मानसिक आणि शारीरिक अत्याचार किती भीषण रूप धारण करू शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण मानले जात आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Jaigad Bomb Blast: जयगड परिसरात गावठी हातबॉम्बचा स्फोट; महिला गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: फाजीला जबीन शेख हिचा मृत्यू कसा झाला?

    Ans: पोस्टमार्टम अहवालानुसार तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला.

  • Que: सासरच्यांनी सुरुवातीला काय दावा केला होता?

    Ans: सासरच्यांनी फाजीलाचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचा दावा केला होता.

  • Que: पोलिसांनी कोणावर कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी पती जुबेर शेख, दीर मोहम्मद इरफान यांना ताब्यात घेतले असून सासऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

Web Title: Nagpur crime save mea desperate call to her mother newlywed dies under suspicious circumstances within hours body exhumed from grave and then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
1

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
2

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
3

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
4

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.