Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा अंतिम निर्णय! सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान-साहिलला फाशीची शिक्षा

१३ महिने, १२७ हून अधिक तारखा आणि २२ पेक्षा जास्त साक्षीदार... अखेर ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा फैसला झाला. सौरभ राजपूत हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 14, 2026 | 05:04 PM
Crime News: ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा अंतिम निर्णय! सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान-साहिलला फाशीची शिक्षा

Crime News: ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा अंतिम निर्णय! सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान-साहिलला फाशीची शिक्षा

Follow Us
Follow Us:
  • ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडात मुस्कान-साहिलला फाशी
  • १३ महिने सुनावणी; १२७ हून अधिक तारखा
  • सौरभच्या हत्येनंतर मृतदेह ड्रममध्ये लपवल्याचा आरोप

मेरठ : उत्तर प्रदेशातील बहुचर्चित ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा अंतिम निर्णय झाला आहे. मर्चंट नेव्हीतील माजी कर्मचारी सौरभ राजपूत यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला या दोन्ही दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. तब्बल १३ महिने चाललेल्या सुनावणीनंतर आज, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने शिक्षेचा निर्णय जाहीर केला.  या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान १२७ हून अधिक तारखा झाल्या, तर २२ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. ३० सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने मुस्कान आणि साहिल यांना सौरभ राजपूत यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर आज दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

शिक्षेपूर्वी दोघांना न्यायालयाची विचारणा

फाशीची शिक्षा सुनावण्यापूर्वी बुधवारी सकाळी मुस्कान आणि साहिल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी दोघांनाही काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केली. मात्र, दोघांनीही काहीही बोलण्यास नकार दिला. यानंतर न्यायालयाने दोन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली.

हेही वाचा: Crime News: ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा निकाल; मुस्कान-साहिल दोषी, आता शिक्षेपूर्वी दोघांची अवस्था चर्चेत

काय आहे ‘ब्लू ड्रम’ हत्याकांड?

मार्च २०२५ मध्ये मेरठमध्ये सौरभ राजपूत यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना आरोपी करण्यात आले होते. हत्येनंतर सौरभ यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. हे तुकडे निळ्या ड्रममध्ये ठेवून त्यात सिमेंट भरून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होता. या घटनेमुळे हे प्रकरण देशभर ‘ब्लू ड्रम हत्याकांड’ म्हणून चर्चेत आले. दीर्घ तपास आणि न्यायालयीन सुनावणीनंतर ३० सप्टेंबर रोजी दोघांना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली.

१३ महिने चालली सुनावणी

या बहुचर्चित प्रकरणात सुमारे १३ महिने सुनावणी झाली. या कालावधीत न्यायालयात १२७ हून अधिक तारखा झाल्या. २२ पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. विविध पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालांचाही न्यायालयीन प्रक्रियेत विचार करण्यात आला. अखेर १४ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावत या प्रकरणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला.

Web Title: Meerut blue drum murder case muskan sahil death sentence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • latest news
  • Murder News

संबंधित बातम्या

Crime News: ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा निकाल; मुस्कान-साहिल दोषी, आता शिक्षेपूर्वी दोघांची अवस्था चर्चेत
1

Crime News: ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा निकाल; मुस्कान-साहिल दोषी, आता शिक्षेपूर्वी दोघांची अवस्था चर्चेत

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत
2

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप
3

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात
4

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.