Nashik Breaking News: भोंदुबाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Ashok Kharat News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat)ला अखेर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज (१ एप्रिल) खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश बी. एन. ईचपुरानी यांच्या कोर्टात अशोक खरातची सुनावणी झाली. यावेळी न्यायधीशांनी त्याला कोठडी सुनावली आहे.
नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासादरम्यान समोर आलेली धक्कादायक माहिती आणि वाढत जाणारी पीडितांची संख्या लक्षात घेता, न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
Ashok kharat News: खरातच्या काळ्या पैशात वाटेकरी असणारे ते ४५ बडे नेते कोण?
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश बी.एन.ईचपुरानी यांच्या समोर खरातच्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे न्यायालयात हजर होते. कामकाजाला सुरुवात होताच अवघ्या ५ मिनिटांत न्यायालयाने आपला निर्णय दिला.
पहिल्या गुन्ह्यात अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.खरातला जरी न्यायालयीन कोठडी मिळाली असली, तरी त्याच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. खरातवर दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, त्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे.
विशेष तपास पथकाच्या (SIT) आतापर्यंतच्या चौकशीत खरातचे अनेक कारनामे उघड झाले आहेत. केवळ लैंगिक शोषणच नाही, तर भाविकांना ‘आर्थिक गंडा’ घातल्याच्या तक्रारींची जंत्रीही आता वाढत चालली आहे. त्याच्याविरोधात दररोज नवनव्या तक्रारी दाखल होत असल्याने एसआयटी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
Ashok Kharat Case : अशोक खरातची पत्नी फरार तर मुलगा हर्षवर्धन अटकेत; ‘या’प्रकरणी पोलिसांकडून कारवाई
आज न्यायालयात कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. न्यायाधीशांनी कागदपत्रांची पडताळणी करून तातडीने निकाल दिला. उद्या खरातला दुसऱ्या गुन्ह्यासाठी पुन्हा कोर्टात आणले जाईल, तेव्हा पोलीस पुन्हा एकदा त्याची कोठडी मागण्याची शक्यता आहे.
खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातलाही अटक
अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला नाशिकच्या कर्मयोगी नगर भागातील ‘त्रिप्ताबाला’ बंगल्यातून अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या अधिकाऱ्यांना सुरुवातीला बंगल्यात प्रवेश नाकारण्यात आला, त्यानंतर त्यांनी शेजारच्या घराची भिंत ओलांडून फिल्मी स्टाईलमध्ये आत प्रवेश केला आणि हर्षवर्धनला ताब्यात घेतले.
अशोक खरातशी नियमितपणे संपर्क साधणाऱ्या अंदाजे ४५ राजकारण्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. खरात याची मुलगी तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेचा फोटो समोर आला आहे. या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांची नावे असल्याचे दिसून येते. नाशिक येथे पार पडलेल्या या लग्नसमारंभालाही अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे. या निमित्ताने अशोक खरात आणि विविध पक्षांतील नेत्यांमधील जवळीक अधोरेखित होत असल्याचे बोलले जात आहे. असेही म्हटले जाते की, हे नेते राजकीय निर्णय घेण्यापूर्वी खरात यांचा सल्ला घेत असत.






