Thane Crime: संतापजनक! नातेवाईकाने आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि नको ते केलं; आरोपी फरार
काय नेमकं प्रकरण?
२००४ मध्ये जमीन हडप केल्याचा गुन्हा तब्बल २२ वर्षांनी २०२६ मध्ये दाखल करण्यात आला. या प्रदीर्घ कालावधीत फिर्यादी किंवा त्यांच्या भावांनी खरेदी खत रद्द करण्यासाठी किंवा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कधीही दिवाणी न्यायालयात दाद मागितली नव्हती, ही बाब न्यायालयाने प्रकर्षाने नोंदवली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. करार करतांना फसवणुकीचा कोणताही अप्रामाणिक हेतू असल्याचे तपासात समोर
आलेले नाही, हा व्यवहार नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे अधिकृतरीत्या झाला असून, केवळ दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचा रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर
न्यायालयाने कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आरोपी कल्पना खरातला पोलिसांच्या गुन्ह्याशी संबंधित तपासात (Police Investigation) पूर्ण सहकार्य करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या निकालामुळे सिन्नर परिसरातील या बहुचर्चित कथित फसवणूक प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
अशोक खरातविरोधात 7 जुलैला सुनावणी
भोंदू अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात याच्याविरोधात देवीशक्ती असल्याचा दावा करून महिला भाविकांची फसवणूक करणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, आर्थिक फसवणूक करणे, खंडणी उकळणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत त्याच्याविरोधात एकूण 17 गुन्ह्यांची नोंद असून, त्यापैकी 12 प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात आहे. महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आठ गुन्ह्यांमध्ये यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता पोलिसांनी २ गुन्ह्यांमध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. २३ जून रोजी दोन प्रकरणांची सुनावणी न्यायालयात होणार होती. मात्र, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.
Ans: त्या कथित भोंदू बाबा अशोक खरात यांच्या पत्नी आहेत.
Ans: दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे.
Ans: न्यायालयाने कल्पना खरात यांना अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला.






