
crime (फोटो सौजन्य: social media)
ईडीचा तपास सुरू
अधिकारी रडारवर
कोट्यवधींचा घोटाळा
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील दोन बनावट कॉल सेंटरचा सीबीआयने पर्दाफाश ऑगस्ट मध्ये केला होता. शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. याप्रकरणी ईडीने मनी लौंड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सूर केला. चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बँक अधिकाऱ्यांचा यात समावेश असल्याचा संशय असून ते देखील ईडीच्या रडारवर आले आहेत. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांना गंडा घातला जात होता.
Vote Chori ची तक्रार अन् पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
नेमकं प्रकरण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवलं जात होतं. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमध्ये विविध मार्गातून फसवणुकीचे कॉल केले जात होते. गिफ्ट गार्ड, क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली परदेशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. यासाठी तब्बल 60 जणांची कॉलिंगसाठी नेमणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने पर्दाफाश केला.
लाच दिल्या जात असल्याचा ठपका
या कॉल सेंटरच्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांचे तसेच बँक अधिकाऱ्यांचे संरक्षण होते. संरक्षणचय बदल्यात त्यांना या कॉल सेंटर मालकाकडून लाच दिली जात असल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. हे अधिकारी या प्रकरणात कधीपासून यात गुंतले आहेत, त्यांना पैसे कसे मिळाले आणि त्या पैशांची फिरवाफिरवी कशी झाली याचा तपास ईडी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महिन्याकाठी चार कोटी रुपये कमवत असल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. सीबीआयने या प्रकरणी मुंबईतून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी २० लाखांची रक्कम, ५०० ग्रॅम सोने आणि सात आलिशान गाड्या आदी मालमत्ता जप्त केली. कमावलेले पॅसीए कुठे आणि कसे गुंतवले याचा तपास ईडी करत आहे. ऑगस्ट महिन्यात सीबीआयने या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. हे कॉल सेंटर इगतपुरी येथील एका रिसॉर्टमधून चालवले जात होते. या कॉल सेंटरमध्ये एकूण ६२ कर्मचारी कार्यरत होते.
सुरळीत कामकाजासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना
या बेकायदेशीर कॉल सेंटर्सच्या सुरळीत कामकाजासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना रोख रक्कम आणि वस्तूंच्या स्वरूपात बेकायदेशीर लाच देत असलायची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, हे घोटाळेबाज नवी दिल्लीतील एका नॅन्सी आणि इतर मार्गांनी युकेचा डेटा गोळा करतात. टीम लीडर म्हणून काम करणारे आणि बेकायदेशीर कृत्यांना चालना देणारे इतरही काही व्यक्तींचा यात समावेश आहे.