आर्थिकदृष्ट्या सक्षम पत्नीला पोटगी नाही; मध्य प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nasrapur Crime Update: नसरापूर येथे अपहरण करून तिचा विनयभंग आणि अनैसर्गिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याने क्रूरतेचा कळस गाठला होता. आरोपीने चिमुकलीच्या मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहावर अत्याचार केले, असा दावा विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मंगळवारी पुण्याच्या विशेष न्यायालयात केला.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. चिमुकलीच्या शवविच्छेदनानंतर ससून रुग्णालयाने दिलेला वैद्यकीय अहवाल विशेष सरकारी वकील मिसर यांनी न्यायालयात वाचून दाखविला. महत्त्वाचा वैद्यकीय पुरावा न्यायालयासमोर सिद्ध केला. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली.
त्यामध्ये सरकार पक्षातर्फे सायबर तज्ज्ञांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर या खटल्यातील अंतिम साक्षीदार म्हणून मुख्य तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्याचे काम विशेष सरकारी वकील मिसर आणि त्यांचे सहायक वकील प्रथमेश शिंगणे यांनी केले; तर बचाव पक्षातर्फे त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. तक्रारदार पीडित कुटुंबाच्या वतीने अॅड. राधिका नावंदर-जोशी आणि ॲड. मनीष पाडेकर उपस्थित होते.
तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याशी संबंधित पत्रव्यवहार, सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय दाखले आणि ससून रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल न्यायालयासमोर सादर केला. निष्पाप चिमुरडीवर झालेले अमानुष, अनैसर्गिक अत्याचार आणि तिच्या मृत्यूचे कारण न्यायालयाला सांगताना तपास अधिकाऱ्यांचा कंठ दाटून आला होता.
‘सरकार पक्षातर्फे अंतिम साक्षीदाराची साक्ष नोंदवण्याचे कामकाज आज (बुधवारी) संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच आरोपी भीमराव कांबळेचा जबाब नोंदविण्याचे कामकाज सुरू होईल. अखेरीस सरकार आणि बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद केला जाईल.’
– अजय मिसर, विशेष सरकारी वकील






