अतिक्रमण हटाव मोहिमेला वाशिम शहरात सुरुवात; पहिल्याच दिवशी अनधिकृत बांधकामांवर जेसीबी
नगरपरिषदेची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असलेली स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे चित्र दिसत आहे. घराघरातून कचरा संकलित करून डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचविणाऱ्या घंटागाड्यांची अवस्था दुर्लक्षित झाली. कारंजा नगर पालिका अंतर्गत फक्त १४ घंटागाडी कार्यरत आहेत. त्यामध्येसुद्धा काही नेहमी नादुरुस्त असतात यामुळे फक्त १० घंटागाड्या ह्या कार्यरत आहेत. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रात वाढीव हद्दीसह एकूण अंदाजे २२ हजार ३० हजार प्लस घरे (मालमत्ता) आहेत. पालिका नियमानुसार एकूण १२०० ते १५०० घरामागे १ घंटागाडी अपेक्षित असून, त्यानुसार एकूण २० घंटागाडीची आवश्यकता असल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असता सध्या १० ते १२ घंटागाडी उपलब्ध आहे.
या खेरीज नगरपालिकेतील आरोग्य विभागाकडून अधिक २० घंटागाडीची मंजुरीकरिता प्रस्ताव दाखल केला असल्याची माहिती आहे. शहराच्या विकासाची चाके इतर क्षेत्रांत वेगाने फिरत असताना, स्वच्छतेच्या मुलभूत व्यवस्थेचे चाक नेमके कुठे अडखळले आहे, याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे.
शहरातील अनेक भागांत घंटागाड्या नियमित येत नसल्याने नागरिकांना स्वतःच कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागत आहे. कोणी चौकात कचरा टाकत आहे, तर काही सुजाण नागरिक दुचाकीवर पोती किंवा पिशव्यांमध्ये कचरा भरून शहराबाहेर नेऊन टाकत आहेत, तर कुणी जवळच्या नालीतच कचरा ओतून देत आहे. परिणामी, चौका-चौकातील कचऱ्याच्या ढिगांवरील घोंघावणाऱ्या माशा, त्यात चारा शोधणारी भटकी जनावरे आणि दुर्गंधीमुळे त्रस्त नागरिक, असे विदारक चित्र शहरात पाहायला मिळाल्यास नवल वाटायला नको.
Buldhana News: समृद्धीवरील अपघातात एक ठार, क्लीनर किरकोळ जखमी; ट्रकची समोरील वाहनाला धडक






