Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur Crime: चिमूरडीला न्याय द्या! पुणे-बंगलोर हायवे 4 तास बंद; आई-वडिलांची फडणवीसांना आर्त हाक

संतप्त ग्रामस्थांनी त्या चिमुकलीचा मृतदेह तेथेच ठेवत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ‘गोळ्या घाला गोळ्या घाला; आरोपीला गोळ्या घाला’ अशा घोषणा देत त्यांनी हायवेवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2026 | 11:28 PM
गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार

गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार

Follow Us
Follow Us:

आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी 
आंदोलकांनी रोखून धरला पुणे – बंगलोर हायवे 
अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांचा नकार

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला असून, न्यायाच्या मागणीसाठी त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी (Crime News) रात्री नसरापूरकरांनी सातारा रोड आडवून धरला. त्यांची पोलिसांनी (Rape Case) समजूत काढली; मात्र शनिवारी चिमुकलीचा मृतदेह पुण्यात पोहोचतांच नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी रात्री उशीरापर्यंत पुणे बंगळुरू महामार्गावर नवले पुलानजिक रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

संतप्त ग्रामस्थांनी त्या चिमुकलीचा मृतदेह तेथेच ठेवत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ‘गोळ्या घाला गोळ्या घाला; आरोपीला गोळ्या घाला’ अशा घोषणा देत त्यांनी नवले पुलाबरोबरच वडगाव बुद्रुक पुलावरही रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या काही तासांपासून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

कारवाई होईपर्यंत अंत्यसंस्कार नाही

पीडितेच्या नातेवाईकांनीही ठोस कारवाई होईपर्यंत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. “जोपर्यंत आरोपीला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या संतप्त वातावरणात पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. रात्री उशीरापर्यंत या भागातील कोंडी कायम होती.

Nasrapur crime News: खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवणार! पोलीस अधीक्षक संदीप गील यांची नसरापूरकरांना ग्वाही

पोलीस अधीक्षक संदीप गील यांची नसरापूरकरांना ग्वाही

नसरापूर येथील चिमुरडीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक केली असून, हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, माहिती पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी दिली. नसरापूर गावात चिमुरडीवर अत्याचारप्रकरणात नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Nasrapur Crime News: चिमुरडीवरील अत्याचारानंतर भोर तालुक्यात जनक्षोभ; पुणे-सातारा महामार्ग रोखला

भीमराव कांबळे हा शेतमजूर असून, मिळेल ते कामे करतो. नसरापूर गावात देखील तो कामानिमित्त आलेला होता. तो मिळेल तो कामे करत भोरमधील वेगवेगळ्या गावात फिरत असतो. मात्र, त्याने शुक्रवारी घृणास्पदप्रकार केला. दरम्यान, कांबळे याच्यावर यापुर्वीचेही दोन विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा हा १९९८ चा तर दुसरा गुन्हा २०१५ मधील असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Nasrapur minor girl case people blocked pune bangalore highway protest cm fadnavis pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 11:24 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police
  • Rape on Minor Girl

संबंधित बातम्या

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
1

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
2

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
3

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
4

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.