Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : ४४ वर्षीय महिलेने उचलला टोकाचा पाऊल; दमबाजी, मारहाण आणि खाजगी फोटो- व्हिडीओ….

नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४४ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी महिलेच्या लिव्ह-इनपार्टनर विरोधात तक्रार दाखल केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 14, 2025 | 03:34 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४४ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ८ जुलैला गोटावळे गाव, रबाळे येथे ही घटना घडली आहे. महिलेने राहत्या घरी आत्महत्या केली. मृतकाच्या मुलीने तिचा लिव्ह-इन पार्टनर विरोधात तक्रार दाखल केली आहे. रबाळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच दमबाजी, मारहाण आणि खाजगी फोटो- व्हिडीओ वायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

फिरायला जाणं बेतलं एकाच्या जीवावर, डॅममध्ये पोहायला गेलेल्यापैकी एकाचा बुडून मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील संदीप जाधव (३७) हा मृत महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. संदीप या महिलेला विश्वासात घेऊन तिच्याकडून १० लाख रुपये उकळले. त्यानंतर महिला त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली. म्हणून आरोपीने तिचे खाजगी फोटो व व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी दिली होती.इतकेच नव्हे तर आरोपी संदीपने महिलेच्या दोन्ही मुलींना सतत फोन करून अश्लील व दमदाटीचे संदेश पाठवले व धमक्या दिल्या. तसेच, पीडितेला वारंवार मारहाण व शारीरिक चाल केल्याचीही माहिती आहे. याच याच मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आत्महत्या केली. असा आरोप मृत महिलेच्या मुलीने तक्रारीत केला आहे.

या प्रकरणी रबाळे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेले नाही आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान नवी मुंबई येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात तब्बल १४०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र त्यातील सुमारे ८०० कॅमेरेच सध्या कार्यरत आहेत. उर्वरित शेकडो कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या हेतूने हे कॅमेरे लावण्यात आले आहेत तो हेतू सध्य होत नसल्याचं दिसून येत आहे. पोलिसांच्या गुन्हे तपास कामात या सीसीटीव्ही फुटेजचा मोठा आधार असतो. गुन्ह्याच्या ठिकाणी किंवा त्या परिसरातील कॅमेऱ्यात आरोपींच्या हालचाली कैद झालेल्या असतात. तसेच आरोपीची तंतोतंत ओळख पटवण्यासाठी हे कॅमेरे महत्वाची भूमिका बजावतात. मात्र शहरातील अनेक कॅमेरे बंद स्थितीत असल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. त्यामुळे तपासासाठी दिवस रात्र मेहनत घेऊनदेखील कधी पुरावे मिळत नाहीत. तर पोलिसांना आरोपीची ओळख पटवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Solapur Crime:तेरा महिन्याच्या बाळाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्य; मात्र मामाच्या संशयाने बॉडी उकरुन काढली आणि….

Web Title: Navi mumbai 44 year old woman takes extreme step bullying beating and private photos videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली
1

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
2

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण
3

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Navi Mumbai :   दिघ्यातील नालेसफाई निविदा संशयाच्या घेऱ्यात ; आयुक्त लक्ष देणार की पाठीशी घालणार ? नागरिकांचा सवाल
4

Navi Mumbai : दिघ्यातील नालेसफाई निविदा संशयाच्या घेऱ्यात ; आयुक्त लक्ष देणार की पाठीशी घालणार ? नागरिकांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.