रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुरुड तालुक्यातील फणसाड डॅममध्ये एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी येथून ११ युवक तिथे फिरायला गेले. तेव्हा एकाच पोहताना मृत्यू झाला. मृतकाचे नाम साहिल राजू रणदिवे असं बुडालेल्या तरुणाचा नाव असून तो २४ वर्षाचा आहे. ही घटना मुरुडमधील बोरली गावाच्या हद्दीत घडली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला (SVRSS) देण्यात आली. त्यांची टीम माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी तब्बल ३८ फूट खोल असलेल्या या डॅममध्ये बुडालेल्या युवकाचा मृतदेह ‘फ्री स्टाईल डायव्हिंग’ पद्धतीने शोधून बाहेर काढण्यात आला. या घटनेचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहे. या घटनेनं परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
दरम्यान सोलापूरमधून एक हृदय पिळवटून कटाकणारी घटना समोर येत आहे. तलावात बुडून तेरा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या कुमठे गावात हि घटना घडली आहे. या मृत्यूच्या घटनेनंतर कुटुंबियांसह कुमठे गावात एकच शोककळा पसरली आहे. बाळाच्या आई वडिलांनी त्याचा अंत्यसंस्कार करून बाळाला पुरलंय. मात्र बाळाच्या मामला या घटनेवर संशय आला आणि त्याने पोलिसांकडे तक्रार करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. बाळाच्या मामाने ११२ वर फोन करून आक्षेप घेतला. ही मृत्यू अनैसर्गिक असल्याचे सांगितले आहे. मामाच्या तक्रारीनंतर या बाळाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या मृत्यूच कारण समजेल. मृत्यू झालेल्या बाळाचा नाव विश्वनाथ नीलकंठ मामुरे असे आहे.
आई वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काल रविवारी (१३ जुलै) सकाळी १० वाजता विश्वनाथ खेळात होता. त्यावेळी खेळतांना तो बुडाला आणि मृत्यू झाला. त्यामुळे संध्याकाळी 4 वाजता आम्ही विधिवत मुलावर अंत्यसंस्कार केले. मात्र या घटनेची कोणतीही माहिती न देता आई वडिलांनी परस्पर अंत्यकार केल्याने बाळाच्या मामाला संशय आला. बाळाच्या मामा स्वप्नील धर्मराज भरमचीने १२२ वर कॉल केला आणि पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह रात्री बाहेर काढला. सध्या पुढील कारवाईसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार अशी माहिती पोलिसांनी दिली. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे.या घटनेने एक खळबळ उडाली आहे.