Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

Navi Mumbai bars closed: मुख्यमंत्र्यांच्या नवी मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद ठेवण्याचे तोंडी आदेश देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोणताही अधिकृत लेखी आदेश नसताना अशा सूचना दिल्याचा दावा होत असल्याने प्रशासन आणि व्यावसायिक वर्तुळात प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 03:56 PM
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी नवी मुंबईत ‘अदृश्य आदेश’? बार, हॉटेल, क्लब बंद ठेवण्याच्या तोंडी आदेशाची चर्चा

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी नवी मुंबईत ‘अदृश्य आदेश’? बार, हॉटेल, क्लब बंद ठेवण्याच्या तोंडी आदेशाची चर्चा

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची धास्ती की सुरक्षेचा भाग?
  • नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद?
  • ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण
सावन वैश्य | नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील परिसरात आयोजित ‘कॅम्पस कनेक्ट’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौरा उद्या म्हणजेच 22  ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता असून नवी मुंबईत चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. या हाय-प्रोफाइल व्हीआयपी दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व डान्स बार, लेडीज बार आणि नाईट क्लब बंद ठेवण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्याचा दावा व्यावसायिक करत आहेत. कोणत्याही अधिकृत परिपत्रकाशिवाय किंवा कायदेशीर नोटीसशिवाय हे निर्बंध लादल्याने हॉटेल व नाईटलाईफ व्यवसायिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

अधिकृत नोटीस की ‘अदृश्य’ दबाव?

सामान्यतः व्हीआयपी किंवा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत लेखी नोटीस जारी केली जाते. मात्र, या प्रकरणात कोणतेही लेखी आदेश न देता केवळ वरिष्ठ पातळीवरून ‘ तोंडी सूचना’ देऊन रात्रीच्या आस्थापना बंद पाडल्या जात असल्याचे बार मालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे “हा अदृश्य आदेश नेमका कोणाचा आणि कोणत्या कायद्याखाली?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…

‘कॅम्पस कनेक्ट’साठी पोलीस आयुक्तांची मेहनत; नागरिकांच्या साथीची गरज

दरम्यान, तरुण पिढीला ड्रग्ज आणि इतर व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कॅम्पस कनेक्ट’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे या मोहिमेसाठी अतिशय मेहनत घेत असून संपूर्ण नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहेत. युवापिढीचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या या कौतुकास्पद आणि चांगल्या उपक्रमाला नवी मुंबईकरांनीही तितकीच मनापासून साथ देणे अत्यंत गरजेचे आहे, असा सूर सुजाण नागरिकांमधून उमटत आहे.

वेळेचे उल्लंघन अन् प्रशासनाची डोकेदुखी

दुसऱ्या बाजूला, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांवरही या निमित्ताने बोट ठेवले जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत आस्थापना बंद केल्या तर कोणालाही अडचण असणार नाही. परंतु, अनेक बार व क्लब चालक सुरक्षेच्या नियमांचा गैरफायदा घेत रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटेपर्यंत अनधिकृतपणे व्यवसाय सुरू ठेवतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि प्रशासनाला अशा कठोर पावलांचा अवलंब करावा लागतो, अशीही चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासन किंवा स्थानिक आयुक्त कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे हा निर्णय केवळ सुरक्षेचा भाग आहे की राजकीय दबावापोटी घेतलेला निर्णय, यावर नवी मुंबईच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 

Web Title: Navi mumbai cm visit verbal order bars hotels clubs closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार
2

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू
3

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
4

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.