Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मुलगी बेपत्ता, न्याय मागण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवरच पोलिसांचा गुन्हा

नवी मुंबईतील रबाळे परिसरातून मुलगी बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीचा शोध लावण्याची मागणी करत गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 23, 2026 | 02:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुलगी बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले.
  • गोंधळ घातल्याप्रकरणी नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला.
  • पोलिसांकडून बेपत्ता मुलीचा शोध सुरू आहे.
नवी मुंबई: नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात गोंधळ पाहायला मिळाला. एका व्यक्तीच्या घरातून मुलगी गायब झाली होती. घरी शोध घेतल्यावर नातेवाईक यांनी इकडे तिकडे विचारपूस केली. मात्र मुलीचा काही केल्या शोध लागला नाही. तेव्हा घरातील सगळे हे रबाळे पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी तक्रार दिली. मात्र आमची मुलगी शोधून द्या अन्यथा आम्ही पोलिस स्टेशन सोडणार नाही. अशी त्यांनी भूमिका घेतल्यावर पोलीस ठाण्यातच मुलीच्या नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद; तब्बल…

पोलिसांनी गुन्हा का दाखल केला ?

रबाळे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 189(1), 189(2) आणि 190 अन्वये नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये जी कलम लावली आहेत. त्यांना या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद यामध्ये आहे. घटनेतील फिर्यादी हे रबाळे पोलीस ठाण्यातीलच पोलीस उपनिरीक्षक युनूस इब्राहिम शेख आहेत. जे पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत. नातेवाईक मध्ये सचिन सुभाष राठोड, राद्वीत राजू राठोड, राजू पांडू राठोड, राजू चंदू राठोड यांच्यासह अन्य चार ते सहा अनोळखी लोकांचा या मध्ये समावेश असून, हे सर्वजण मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत. सध्या ते मुंबईतील बदलापूर येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र २१ मे २०२६ रोजी घरातील सगळे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यावर गोंधळ झाला. सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई परिसरात मुली गायब होण्याच प्रमाण वाढलं

नवी मुंबई परिसरात सातत्याने नागरिक तक्रार करत आहेत. या परिसरातून मुल गायब होण्याच प्रमाण वाढलं आहे. लहान मुल सुरक्षित नाहीत. मात्र मुलगी गायब झाल्यावर पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेल्यावर घरातील व्यक्तीवरच गुन्हा दाखल करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आम्ही पोलीस स्टेशनला येवून न्याय नाही मागणार तर कुठे जाणार? असा सवाल आता नातेवाईक व्यक्त करत आहेत. सामाजिक संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेत रबाळे पोलीस अधिकच तपास करत आहेत. या मुलगी कुठे गायब झाली? याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. दोन दिवसांपासून मुलगी गायब आहे तिचा शोध घेतला जात आहे.

Nagpur Crime: नात्याला काळिमा! ATM पैशांच्या वादातून नातवाने केली आजीची निर्घृण हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात ही घटना घडली.

  • Que: नातेवाईकांवर कोणत्या कारणाने गुन्हा दाखल झाला?

    Ans: सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

  • Que: पोलिस सध्या काय तपास करत आहेत?

    Ans: बेपत्ता मुलीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Navi mumbai crime girl goes missing in navi mumbai police register case against relatives who sought justice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
1

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार
3

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू
4

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.