Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stamp Duty Scam: नवी मुंबईत हजारो कोटींचा दस्त नोंदणी घोटाळ्याचा पर्दाफाश! दोषी अधिकाऱ्याला थेट सेवेतून बडतर्फ करणार

Stamp Duty Scam: अनेक प्रकरणांमध्ये अधिकारी 'अॅडज्युडीकेशन'च्या नावाखाली आधी मुद्रांक शुल्क जास्त लावणे आणि नंतर कमी करणे, असे गैरप्रकार करत असल्याचे समोर आले आहे. यावर कठोर पावले उचलत महसूलमंत्र्यांनी राज्यव्यापी चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 26, 2026 | 04:24 PM
मोदी सरकारमधील राज्यमंत्र्यावर घोटाळ्याचा आरोप; तब्बल 99 लाखांचे अनुदान वाटले?

मोदी सरकारमधील राज्यमंत्र्यावर घोटाळ्याचा आरोप; तब्बल 99 लाखांचे अनुदान वाटले?

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबईतील १४ कोटींच्या महसूल चोरीचा मुद्दा मांडल्यानंतर १० दिवसांत ८०० दस्त नोंदवणाऱ्या लिपिकाला तात्काळ निलंबित
  • संबंधित लाचखोर अधिकाऱ्याला थेट सेवेतून बडतर्फ (Dismiss) करण्याचे आदेश
  • ५ वर्षांच्या कालावधीतील राज्यातील सर्व ‘ॲडज्युडीकेशन’ प्रकरणांची महालेखापालामार्फत सखोल चौकशी
Stamp Duty Scam: नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचे प्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसेच, मुद्रांक शुल्कातील अधिकारांचा अर्धन्यायिक गैरवापर रोखण्यासाठी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६ या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची ‘महालेखापाल’ यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

Ayodhya Ram Temple : राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठी घडामोड; चोरी प्रकरणानंतर तीन सदस्यांचे राजीनामे

शासनाचा १४ लाख रुपयांचा महसूल बुडाला

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी ही माहिती दिली. नवी मुंबईतील एका वरिष्ठ लिपिकाने मुद्रांक अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या १० दिवसांत तब्बल ८०० पेक्षा जास्त दस्तांची नोंदणी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे शासनाचा तब्बल १३ कोटी ९९ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे तसेच अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार बिल्डरांशी संगनमत करून नियोजनबद्ध पद्धतीने केलेला स्कॅम आहे. अशा अधिकाऱ्यांना नोकरीत ठेवणे उपयोगाचे नाही. कायदेशीर बाबी तपासून या अधिकाऱ्याला कायमचे बडतर्फ करण्याच्या दिशेने शासन पावले उचलत आहे,’ असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

 

१० ते २० हजार कोटींचा घोटाळा

अनेक प्रकरणांमध्ये अधिकारी ‘अॅडज्युडीकेशन’च्या नावाखाली आधी मुद्रांक शुल्क जास्त लावणे आणि नंतर कमी करणे, असे गैरप्रकार करत असल्याचे समोर आले आहे. यावर कठोर पावले उचलत महसूलमंत्र्यांनी राज्यव्यापी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचे महालेखापाल यांच्यामार्फत केली जाईल. एजी यांच्याकडे कामाचा ताण असल्याने, या तपासासाठी एक विशेष ‘टास्क फोर्स’ नेमण्यात येईल, यासाठी लागणारा सर्व निधी आणि मनुष्यबळ राज्य सरकार पुरवेल. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यात झालेल्या सर्व ‘अॅडज्युडीकेशन’ प्रकरणांची तपासणी केली जाईल. ‘या चौकशीतून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. यातून राज्याचा १० ते २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.’

‘गँगस्टरही अशी भाषा बोलणार नाही, असं खासदार बोलतोय’; राज ठाकरे यांचा संजय दिना पाटलांवर निशाणा

अधिकाऱ्यांसाठी नवी ‘एसओपी’

अर्धन्यायिक अधिकार हे पूर्णपणे न्यायिक अधिकार नाहीत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी ‘स्टॅम्प अॅक्ट’च्या मर्यादेतच राहून काम करणे बंधनकारक आहे. यापुढे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासन आजच एक नवी मार्गदर्शक तत्त्वे आणि शासन निर्णय जारी करत आहे. यापुढे ‘अॅडज्युडीकेशन’ करताना कोणत्याही अधिकाऱ्याने नियमांच्या बाहेर जाऊन काम केल्यास, ते थेट फौजदारी गुन्ह्यास पात्र ठरतील, असा सज्जड दम महसूलमंत्र्यांनी दिला आहे.

 

Web Title: Navi mumbai document registration stamp duty scam chandrashekhar bawankule orders ag probe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Financial Scam
  • Jitendra Awhad
  • Maharashtra Politics
  • Stamp Duty

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध
3

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.