Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: फेसबुकवरून संपर्कात, कोट्यवधी रूपयांचा लोभ अन् तब्बल ₹56.27 लाखांची फसवणूक

नवी मुंबईत सायबर फसवणुकीत पर्यावरण सल्लागार सुरज यादव यांना फॉरेक्स गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ₹56.27 लाखांचा गंडा. फेसबुक-व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे विश्वास संपादन, बनावट नफा दाखवला. गुन्हा दाखल, तपास सुरु.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 06, 2025 | 10:20 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • फेसबुकवरील ‘आरोही मिश्रा’ प्रोफाइलद्वारे संपर्क
  • फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष
  • एकूण ₹56.27 लाखांची फसवणूक
नवी मुंबई: नवी मुंबईतून सायबर फसवणुकीचा प्रकरण समोर आले आहे. तब्बल ₹56,27,410 एवढ्या लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरण सल्लागार सुरज विलास यादव (३७ वर्षीय, तळोजा) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कशी झाली फसवणूक, काय घडलं नेमकं?

समोर आलेल्या माहितीनुसार, सुरज यादव यांच्याशी ‘आरोही मिश्रा’ नावाच्या महिला प्रोफाइलमधून फेसबुकवर संपर्क साधण्यात आला. तिने फॉरेक्स ट्रेडिंगद्वारे जलद आणि भरघोस नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यांनतर सुरुवातीला इंग्लिश संभाषण, हाय-प्रोफाईल भाषा शैली, आर्थिक तज्ज्ञ असल्याचा आव आणून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला.

‘माझ्याविरोधात इन्स्टाग्रामवर स्टोरी का लावतो’ म्हणत तरुणावर धारदार शस्त्राने वार; मध्यस्थी करणाऱ्याला तर…

विश्वास बसताच त्यांना एका व्हॉट्सअॅप गुंतवणूक ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये ‘रमेश शर्मा’ नावाच्या व्यक्तीद्वारे गुतवणुकीसाठी विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले गेले. सुरुवातीच्या टप्प्यात काही व्यवहारांमध्ये कृत्रिमरीत्या नफा दाखवून फिर्यादींचा पूर्ण विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या निर्देशांनुसार टप्प्याटप्प्याने अनेक वेळा रक्कम जमा केली. अखेरीस एकूण ₹56.27 लाख इतकी रक्कम गुंतवणुकीच्या नावाखाली ट्रान्सफर करण्यात आली.

फिर्यादींना mingcoin-cloud या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावाने तब्बल ₹21.17 कोटी शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले.मात्र, फिर्यादींनी ही शिल्लक रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक वेळी नवीन कारण देऊन व्यवहार नाकारण्यात आला. बराच प्रयत्न करूनही पैसे न मिळाल्याने आणि वेबसाइटवरील हालचाल संशयास्पद असल्याने हे संपूर्ण व्यवहार फसवणुकीचे असल्याचे स्पष्ट झाले.

गुन्हा दाखल?

फसवणूक झाल्यानंतर तातडीने पीडित सुरज यवाद यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या गुन्ह्याचा तपास पोलीस करत असून नवी मुंबईमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढत असल्याने नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणूक प्रस्तावांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणताही संशयास्पद व्यवहार, गुंतवणूक लिंक किंवा आर्थिक फसवणूक आढळल्यास सायबर हेल्पलाइन 112 किंवा नवी मुंबई नेरुळ सायबर पोलीस ठाण्यात तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये नर्तिकेची आत्महत्या, भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड अटकेत; नेमकं प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: फसवणूक कशी केली गेली?

    Ans: फेसबुकवर संपर्क, फॉरेक्समध्ये मोठ्या नफ्याचे प्रलोभन, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडून बनावट नफा दाखवून पैसे जमा करून घेतले.

  • Que: किती नुकसान झाले?

    Ans: पीडित सुरज यादव यांच्याकडून एकूण ₹56.27 लाखांची फसवणूक झाली.

  • Que: पुढे काय कारवाई झाली?

    Ans: नवी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन.

Web Title: Navi mumbaicontact through facebook and greed of crores and fraud of 5627 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • crime
  • cyber crime
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ऑडिशनच्या नावाखाली अर्धनग्न फोटो मागितले; नंतर ब्लॅकमेल करून… ; मुंबईतील घटना
1

Mumbai Crime: ऑडिशनच्या नावाखाली अर्धनग्न फोटो मागितले; नंतर ब्लॅकमेल करून… ; मुंबईतील घटना

Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये नर्तिकेची आत्महत्या, भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड अटकेत; नेमकं प्रकरण काय?
2

Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये नर्तिकेची आत्महत्या, भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड अटकेत; नेमकं प्रकरण काय?

Cyber Crime : भारतामध्ये २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद, दर मिनिटाला ५०५ डिटेक्‍शन्‍स
3

Cyber Crime : भारतामध्ये २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद, दर मिनिटाला ५०५ डिटेक्‍शन्‍स

Lawrence Bishnoi : ‘मी लॉरेन्स भाईंच्या चप्पल उचलायचो, तुम्ही सुरुवात केली, संपवणार आम्ही’, गोल्डी बरारला धमकी देणारा ऑडिओ व्हायरल
4

Lawrence Bishnoi : ‘मी लॉरेन्स भाईंच्या चप्पल उचलायचो, तुम्ही सुरुवात केली, संपवणार आम्ही’, गोल्डी बरारला धमकी देणारा ऑडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.