नेमकं प्रकरण काय?
टिटवाळा येथील गोवेली रोडवर रक्ताच्या दागाने माखलेली एक उबेर कार आढळून आली होती. टिटवाळा पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त करत या प्रकरणाचा तपास करीत होते. टिटवाळा पोलीलांसह ठाणे एलसीबी देखील तपास करीत आहे. ठाणे एलबीसीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने हा तपास सुरु केला.
पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने उबेर कंपनीची ही कार असल्याने राेड मॅप आणि शेवटचा प्रवासी कोण आहे? याचा शोध लावला. तपासात पोलिसांना माहिती मिळाली की आदर्श भालेराव नावाच्या व्यक्तीने ही गाडी पुण्याला जाण्यासाठी बुक केली होती. आदर्श हा इंजिनिरिंगच्या द्वितीय वर्षाला आहे तो त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पुण्याला निघाला होता. त्यासाठी त्याने उबेर कार बुक केली. गाडी चालक नासीर अन्सारी आला. त्याने प्रवासी आदर्शला घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.
गाडी गणेश खिंडीजवळ आली असता चालक नासीर याने गाडी थांबविली. नासीरने चाकूचा धाक दाखवून आदर्शकडे पैशाची मागणी केली. तुझ्याकडे असलेले पैसे दे, असं तो म्हणाला. यावेळी आदर्शने त्याला प्रतिकार केला. यात दोघात जोरदार झटापट झाली. या झटापटीत नाशीरच्या हातीतील चाकू आदर्शच्या हाती आला. आणि तो नासीरच्या गळ्याला लागल्याने नासीरचा गळा चिरला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
हत्या करण्याचा हेतू नव्हता, मात्र…
नासीरचा मृतदेह तिथेच टाकून आदर्शने उबेर गाडी टिटवाळ्याला आणली. गाडी टिटवाळा गोवेली रस्त्यावर टाकून तिथून तो पळून गेला. आदर्शचा नासीरची हत्या करण्याचा हेतू नव्हता. मात्र त्याच्याकडून हा गुन्हा घडला.
नासिरला पैश्याची गरज होती
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता हे लक्षात आले की, नासिरला पैश्याची गरज होती. त्याने चार पाच जणांकडून पैसे मागितले होते. पोलिसांनी आदर्शला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले
Ans: ही घटना टिटवाळा परिसरात उघडकीस आली.
Ans: उबेर चालक नासीर अन्सारी याचा मृतदेह पोलिसांना सापडला.
Ans: इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आदर्श भालेराव याच्यावर हत्येचा आरोप आहे.






