Photo Credit-Social Media नोएडाl हातोड्याने वार करत बापाने केली आईची हत्या
नोएडा: नोएडातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. “गुड व्हाइब्स ओन्ली”, “ड्रीम”, “स्टे हम्बल” अशा सकारात्मक कोट्सने सजलेल्या एका खोलीत एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. नोएडाच्या ठाणे फेज-१ परिसरातील सेक्टर-१५ मध्ये शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर मृतदेहाचे पोस्टमॉर्टमही करण्यात आले आहे.
डीसीपी रामबदन सिंह दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मृत महिला आमसा यांच्या मुलाने डायल ११२ द्वारे पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच फेज-१ पोलिस ठाण्याचे पोलिस पथक आणि फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मृत महिलेचे नाव ४२ वर्षीय आस्मा खान असे आहे, तर आरोपीचे नाव नुरुल्लाह हैदर (५५) असे आहे, जो सेक्टर १५ मधील सी-१५४ येथे राहत होता. आरोपीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. सध्या घटनास्थळी शांतता आणि सुव्यवस्था राखली जात आहे.
Dinanath Mangeshkar News: दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा आणखी एक गैरकारभार समोर; कोट्यवधींची थकबाकी
डीसीपी रामबदन सिंह म्हणाले की, चौकशीदरम्यान आरोपी पतीने पोलिसांना सांगितले की त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती आणि म्हणूनच त्याने हा गुन्हा केला. आरोपीच्या जबाबानंतर पोलिस सर्व पैलू लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘आसमाच्या मुलीने सकाळीच ते अनेक दिवसांपासून आपापसात भांडत असल्याचे सांगितले होते. पण तो असे पाऊल उचलेल, अशी आमची अपेक्षा नव्हती. आसमाची हातोड्याने वार करून हत्या करण्यातआली, अशी प्रतिक्रीया मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे.
उत्तराखंड: उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये, पोलिसांनी शुक्रवारी दोन अल्पवयीन मुलीवर आणि मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोघांना अटक केली. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर ही कारवाई केली. डेहराडून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहसपूरमधील दंडपूरच्या जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गुप्त माहिती मिळाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. १ एप्रिल रोजी एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की हसनपूर गावातील एका पुरूषाने तिच्या १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे आणि आरोपीच्या मित्राने तिच्या मित्राचा विनयभंग केला आहे.
हैदराबाद : हैदराबाद येथील अमीनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तीन मुलांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या आईला अटक केली आहे. पतीला सोडून प्रियकरासोबत नवीन जीवन सुरू करण्यासाठी तिने पोटच्या तीन मुलांची निघृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील अमीनपुर येथील एका घरात तीन मुले बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. या मुलांना आणि त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस तपासात त्यांच्या आईनेच मुलांचा गळा आवळून खून केला असल्याचे निष्पन्न झाले. १२, १० आणि ८ वर्षाची ही मुले आहेत.






