Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी
फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झालेला रयोमेन सुकुना बंडल पुढील अनेक आठवड्यांसाठी लाईव्ह असणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स रयोमेन सुकुना बंडल मोफत क्लेम करू शकणार आहेत. हा एक खास बंडल आहे. या बंडलमुळे प्लेअर्सना दोन आकर्षक लूक मिळतात. एवढंच नाही तर बंडल व्यतिरिक्त या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स रयोमेन सुकुना व्हॉइस पॅक देखील क्लेम करू शकणार आहेत. हे मोफत रिवॉर्ड मिळवण्यासाठी, तुम्हाला स्पिन करून गेममध्ये तुमचे नशीब आजमावावे लागेल. स्पिन करण्यासाठी तुम्हाला डायमंड खर्च करावे लागतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
सुकुना रिंग ईव्हेंटमध्ये पहिले स्पिन मोफत आहे. 5 वेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 90 नाही तर केवळ 45 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.






