आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात उतरवताना अनेक जण खूप कष्ट करत असतात. यातही कित्येकांना कारची पूर्ण रक्कम एकाच वेळी देता येत नाही. अशावेळी, कार लोन नक्कीच त्यांच्या उपयोगी पडते. मात्र, काही बँक जास्त व्याजदर आकारतात त्यामुळे कार खरेदीदारांना जास्त पैसे द्यावे लागतात. हीच बाब लक्षात घेऊन यंदाच्या दिवाळीत 5 सरकारी बँका सर्वात स्वस्त कार लोन देत आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
फोटो सौजन्य: iStock
युनियन बँक ऑफ इंडियाचा व्याजदर 7.80% ते 9.70% दरम्यान आहे. 5 लाख रुपयांच्या कर्जावर 5 वर्षांच्या कालावधीत ईएमआय 10,090 ते 10,550 रुपयांपर्यंत असेल. सणासुदीच्या ऑफरअंतर्गत प्रोसेसिंग फी पूर्णपणे मोफत आहे.
पंजाब नॅशनल बँकेचा व्याजदर 7.85% ते 9.70% इतका आहे. या बँकेत 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी ईएमआय 10,102 ते 10,550 रुपयांच्या दरम्यान येतो. प्रोसेसिंग फी 0.25% असून सुमारे 1,000 ते 1,500 रुपये आकारली जाऊ शकते.
बँक ऑफ बडोदामध्ये व्याजदर 8.15% ते 11.60% इतका आहे. त्याच कर्जावर ईएमआय 10,174 ते 11,021 रुपयांपर्यंत असतो. प्रोसेसिंग फी कमाल 2,000 रुपये आहे.
बँक ऑफ इंडियाचा व्याजदर 7.85% ते 12.15% दरम्यान आहे. या कर्जावर ईएमआय 10,102 ते 11,160 रुपये इतका असेल. प्रोसेसिंग फी 0.25% असून ती 2,500 ते 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
कॅनरा बँक 7.70% ते 11.70% दरम्यान व्याजदर देत आहे. या बँकेत ईएमआय 10,067 ते 11,047 रुपयांपर्यंत असेल. प्रोसेसिंग फी 0.25% म्हणजेच 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत आकारली जाऊ शकते.