गोड्डा : झारखंडमधील (Jharkhand) गोड्डा जिल्ह्यात (Godda District) बहीण आणि भावाने (Sister And Brother) कीटकनाशक (Insecticide) प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न (Commit Suicide Attempt) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पाथरगामा पोलीस ठाण्याच्या (Pathargama Police Station) हद्दीतील एका गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण गेल्या तीन वर्षांपासून एका गुप्त आजाराने (Gupt Rog) त्रस्त आहे. यासाठी त्याच्यावर सातत्याने उपचार केले जात आहेत, मात्र औषधोपचार व औषधी वनस्पती घेऊनही तो बरा होत नाही. याच कारणामुळे नैराश्यातून त्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
बहिणीने आपल्या भावाला कीटकनाशक खाताना पाहिल्यानंतर तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणाने ते मान्य न करता कीटकनाशक तोंडात ओतले. त्यामुळे तणावात असल्याने त्याच्या बहिणीनेही कीटकनाशक प्राशन केले. काही काळानंतर दोन्ही भावंडांची प्रकृती ढासळू लागली. त्यांनी कीटकनाशकांचा वापर केल्याची माहिती कुटुंबीयांना समजताच, एकच खळबळ उडाली.
[read_also content=”UP: पत्नी आहे की कैदाशीण! पतीने विचारला प्रश्न,पत्नीने उत्तराऐवजी तोंडावरच फेकलं ॲसिड – पाहा हृदयद्रावक VIDEO https://www.navarashtra.com/crime/horrible-up-wife-or-monster-husband-asked-a-question-then-wife-threw-acid-on-husbands-face-kanpur-crime-video-viral-nrvb-365832.html”]
भाऊ आणि बहिणीला तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे दोघांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.
त्याच्या आईने सांगितले की, तिचा मुलगा तीन वर्षांपासून गुप्त आजाराने ग्रस्त होता. खूप उपचार करूनही सुधारणा होत नव्हती. त्यामुळेच आजाराला कंटाळून मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिचं ऐकलंच नाही. यानंतर मुलीनेही घाबरून तेच औषध (कीटकनाशक) प्राशन केले.
[read_also content=”भयंकर! शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला सोडून डॉक्टरच एकमेकांना आपसात भिडले आणि VIDEO मुळे उडालीये खळबळ https://www.navarashtra.com/viral/doctors-fighting-with-each-other-leaving-the-patient-during-operation-weird-video-creating-sensation-on-social-media-nrvb-365805.html”]
घटनेच्या वेळी भाऊ आणि बहीण दोघेही घरी एकटेच होते, असे सांगितले जात आहे. त्यांची आई बाहेर गेली होती. ती परत आली तेव्हा दोघांची प्रकृती ढासळत असल्याचे तिने पाहिले. यानंतर आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती ठीक आहे.