Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑन ड्युटी पोलिसाला भरधाव कंटेनरने चिरडले…; वाढदिवसाच्या दिवशी करावे लागले अंत्यसंस्कार

वडगाव मावळमधील तळेगाव दाभाडे फाटा पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना भरधाव कंटेनरने चिरडले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

  • By प्रीति माने
Updated On: May 14, 2025 | 10:46 AM
On-duty traffic policeman crushed by container on Talegaon Dabhade Phata Pune Mumbai highway

On-duty traffic policeman crushed by container on Talegaon Dabhade Phata Pune Mumbai highway

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : पुणे मुंबई महामार्गावर वडगाव तळेगाव फाटा चौकात कर्तव्यावर असणाऱ्या एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला आहे. त्यांना ऑन ड्युटी असताना भरधाव कंटेनरने चिरडले. या अपघातमध्ये वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.13) रात्री 9:40 वा. वडगाव तळेगाव दाभाडे फाटा पुणे मुंबई महामार्गावर घडली. यामुळे वडगाव मावळमध्ये हळहळ व्यक्त केली.

वाहतूक पोलीस मिथुन वसंत धेंडे (वय 49)  रा. उरुळी कांचन पुणे सध्या वडगाव पोलीस स्टेशन ता.मावळ जि.पुणे असे अपघातात मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बाजू कडून चाकणकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर चालकाने वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चिरडले. यात वाहतूक पोलीस मिथुन धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक चाकण बाजूला वेगाने निघून गेला. कंटेनर चालक हा कार्ला फाटा येथून धोकादायक भरधाव वाहन चालवत असतानाचा, एका तरुणाने व्हिडिओ काढला. पोलिसांना माहिती दिली. पुणे ग्रामीण कंट्रोल वरून कंटेनर थांबविण्याचे आदेश झाल्याने कंटेनर थांबवत असताना, भरभाव वेगाने वाहतूक पोलिसांना चिरडले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या अपघाताचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे.१४ मे रोजी धेंडे यांचा वाढदिवस होता. या अपघाती निधनाने वडगाव मावळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्कार

मिथुन धेंडे यांचा बुधवारी (14 मे) वाढदिवस होता. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराने त्यांच्या वाढदिवसाचे नियोजन केले होते. मात्र वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्यावर काळाने घाला घातला. वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. धेंडे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी उरुळी कांचन येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मधमाश्यांचा लोकांवर हल्ला

वडगाव मावळ भागातील औद्योगिक क्षेत्रातील असलेल्या नवलाख उंब्रे हद्दीतील डोंगरावर सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.६ मे) सकाळी घडली. हनुमंत बबूशा कोयते (44) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर (सर्व रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) अशी जखमींची नावे आहेत.तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंब्रे हद्दीतील डोंगरावर दररोज स्थानिक नागरिक मॉर्निंग वॉक सकाळी फिरण्यासाठी जातात. मंगळवारी सकाळी हनुमंत कोयते, दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर हे चौघेजण मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. डोंगर चढत असताना डोंगरमधील तामकडा येथे अचानक चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात हनुमंत कोयते यांचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Web Title: On duty traffic policeman crushed by container on talegaon dabhade phata pune mumbai highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Police
  • maval news

संबंधित बातम्या

Accident News : रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; दोघे जखमी
1

Accident News : रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; दोघे जखमी

Pune Crime : चारित्र्याचा संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; डोक्यात सिलेंडर घातला अन्…
2

Pune Crime : चारित्र्याचा संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; डोक्यात सिलेंडर घातला अन्…

रेणापूर परिसरात खळबळ! शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
3

रेणापूर परिसरात खळबळ! शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Love Jihad : हिंदू मुलगा बनून 23 वर्षीय दलित मुलीला जाळ्यात अडकवलं, प्राण्यांच्या रक्ताने घातली आंघोळ; धर्मपरिवर्तन केलं अन्…
4

Love Jihad : हिंदू मुलगा बनून 23 वर्षीय दलित मुलीला जाळ्यात अडकवलं, प्राण्यांच्या रक्ताने घातली आंघोळ; धर्मपरिवर्तन केलं अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.