Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीषण अन् महाभयंकर! परत जातो म्हणून निघाला अन्…; नाणेघाटात ‘त्या’ युवकासोबत घडले तरी काय?

बेपत्ता  युवकाची डोंगरावर अर्धवट ठिकाणी एक चप्पल सापडली . तसेच दरीत घसरल्याच्या खुणा दिसल्याने तो युवक पावसामध्ये पाय घसरून दरीत पडला असण्याची दाट शक्यता वाटली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 21, 2026 | 09:36 PM
भीषण अन् महाभयंकर! परत जातो म्हणून निघाला अन्…; नाणेघाटात ‘त्या’ युवकासोबत घडले तरी काय?
Follow Us
Follow Us:
नाणेघाटातील कड्यावरून दरीत कोसळल्याने चार मित्रांपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू
नाणेघाट येथील ‘नानाचा अंगठा’ या डोंगरावर घडली घटना 
दत्ता विनायक लोंढे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव
 
नारायणगाव: महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाचा दर्जा भेटलेल्या जुन्नर तालुक्यात व मुरबाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ऐतिहासिक नाणेघाट येथील ‘नानाचा अंगठा’ या डोंगरावर  गेलेल्या चार मित्रांपैकी एकाचा कड्यावरून पाय घसरल्याने दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना (दि २० जुलै रोजी) घडली.दत्ता विनायक लोंढे (वय २२)  रा. -पारगाव ता. आंबेगाव, जि. पुणे असे दरीत पडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याचा मृतदेह (दि २१ रोजी) शोधून काढण्यात मुरबाड येथील सह्यगिरी रेस्क्यू टीमला यश आले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस लक्ष्मण काटे (वय २५), सुनील बाबुराव पवार (वय २३), अनिकेत संदीप ढोबळे (वय २२), दत्ता विनायक लोंढे (वय २२ सर्व रा. -पारगाव ता. आंबेगाव, जि. पुणे हे नाणेघाट परिसरात फिरण्यासाठी गेले होते.दरम्यान निम्म्या वाटेतून परत जातो म्हणून निघालेला दत्ता लोंढे हा पार्किंगच्या ठिकाणी गाडीमध्ये दिसला नाही म्हणून त्याच्या सोबतच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता तो जवळपास कोठेही दिसला नाही. या घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत चौधरी व पोलिस पथक रवाना झाले . आपदा विभागातील रेस्क्यू टीम, फॉरेस्ट विभाग यांना माहिती देऊन त्या ठिकाणी शोध व बचाव कार्य सुरू केले असता दाट धुक्यामुळे दरीमध्ये काहीही दिसून येत नसल्याने शोधण्यात अडचण निर्माण झाली.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

बेपत्ता  युवकाची डोंगरावर अर्धवट ठिकाणी एक चप्पल सापडली . तसेच दरीत घसरल्याच्या खुणा दिसल्याने तो युवक पावसामध्ये पाय घसरून दरीत पडला असण्याची दाट शक्यता वाटली. घटनास्थळी आपदा मित्र सुशांत भुजबळ रेस्क्यू टीम सदस्य आदित्य डेरे, शंतनू डेरे जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांनी थर्मल ड्रोन द्वारे या ठिकाणी पाहणी केली असता पाऊस वारा व धुके यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली.

दि. २१ सकाळी पुन्हा शोधमोहीम मुरबाडच्या दिशेने चालू केली असता मुरबाड येथील दीपक विशे यांच्या सह्यगिरी रेस्क्यू टीमच्या कुसुम विशे, संदेश गपाट, हेमंत ठोंबरे, रामदास ठोंबरे, मारुती वाघ, हरि लोबी, समीर ठोंबरे यांनी सुमारे साडे तीन तास अथक प्रयत्न करून सकाळी ९.३० च्या सुमारास युवकाचा मृतदेह शोधून काढण्यात यश मिळविले. दरम्यान पर्यटकांनी अशा परिसरात जाताना सतर्कता बाळगण्याचे व घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

जेजुरी वारी मार्गावर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

मुरबाड जि.ठाणे येथील सह्यगिरी रेस्क्यु टीमने या वर्षभरात दहा बचाव कार्य केले असून त्यापैकी सहा बचाव कार्यामध्ये मृतदेह शोधून काढले आहेत.हे मृतदेह २० ते २५ वयोगटातील आहेत तरुणांनी फिरायला जाताना मद्यप्राशन करू नये, तसेच नको धाडसही करू नये असे आवाहन सहयगिरी रेस्क्यू टीमचे दीपक विशे व पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी यांनी केले आहे.

Web Title: One of four friends met with a tragic death after falling into valley from a cliff at naneghat accident pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Accident Case
  • Death
  • junnar news
  • Tourist Place

संबंधित बातम्या

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
1

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.