Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये घुसला, एकाचा मृत्यू तर एक जखमी; धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात

धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी पुलाजवळ शुक्रवारी (१२ जून) सकाळी भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या दामोधरण लॉजमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2026 | 11:47 AM
भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये घुसला, एकाचा मृत्यू तर एक जखमी; धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात

भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये घुसला, एकाचा मृत्यू तर एक जखमी; धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात अपघाताचे प्रमाण वाढले असून, जररोज अनेकांना अपघातांमध्ये जीव गमवावा लागत आहे. अशातच आता धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी पुलाजवळ शुक्रवारी (१२ जून) सकाळी भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या दामोधरण लॉजमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ट्रक चालक विनोद चंद्रशेखर पांडे यांचा मृत्यू झाला, तर क्लिनर राघव कुमार मिश्रा (वय २२) गंभीर जखमी झाला आहे.

 

अपघातात लॉज व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लासूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारा (जीजे-०४-एएक्स-९७९९) क्रमांकाचा ट्रक सुमारे ३२ टन वॉशिंग पावडरचा माल घेऊन जात होता. सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास करोडी पुलाजवळ ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दामोधरण लॉजमध्ये घुसला. धडकेचा आवाज परिसरात घुमल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातानंतर चालक विनोद पांडे व क्लिनर राघव मिश्रा हे दोघेही ट्रकमध्ये अडकून गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान विनोद पांडे यांचा मृत्यू झाला. राघव मिश्रा याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

हे सुद्धा वाचा : वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल

…अन् वाहतूक केली सुरळीत

ट्रक ज्या दामोधरण लॉजमध्ये घुसला ते लॉज अपघाताच्या वेळी रिकामे होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. हे लॉज विलास जाधव यांच्या मालकीचे असून गणेश साळुंके व राजेश जमधडे यांच्याकडे भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात आले आहे. ट्रकच्या धडकेत इमारतीचा काही भाग क्षतिग्रस्त झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखा व दौलताबाद पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात हलवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त ट्रक हटविण्यासाठीही यंत्रणा तातडीने कामाला लागली.

जखमींना मदत करण्यासाठी करोडीचे सरपंच देविदास गावंडे, दगडू चव्हाण, गौतम उबाळे व आकाश बोर्ड यांनी घटनास्थळी धाव घेतली. धुळे-सोलापूर महामार्ग वाहतूक सुरक्षा व्यवस्थापक रवी इंगळे यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसह मदतकार्य करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले.

हे सुद्धा वाचा : वाई-बावधन ओढ्याजवळ भीषण अपघात भरधाव ट्रक दुकानात घुसला, एक ठार, एक जखमी

Web Title: One person has died in a horrific accident on the dhule solapur highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • crime news

संबंधित बातम्या

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त
1

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
2

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी…
3

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी…

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार
4

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.