वाई-बावधन ओढ्याजवळ भीषण अपघात भरधाव ट्रक दुकानात घुसला
दुकानासमोर उभी असलेली एमएच ११ सीएफ ०७६७ क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी, जी विश्वजीत अशोक शिंदे यांच्या मालकीची असून अजित आत्माराम शिंदे (रा. बावधन, ता. वाई) यांच्या दुकानासमोर उभी होती, तीही या अपघातात गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक नितीन कांबळे (रा. व्याहळी) हा वाईहून पाचवडकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण गमावून बसला. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार चालकाने मद्यप्राशन केले असल्यानेच हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पीएसआय अमित सुर्वे, रुपेश जाधव (ट्रॅफिक हवालदार) तसेच गोरखनाथ दाभाडे विशाल येवले राम कोळी धीरज कुमार भोसले राहुल भोईर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी ११२ क्रमांकावर संपर्क साधण्यात आला; मात्र वेळेवर शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. अखेर पोलिसांनी मानवतेचे दर्शन घडवत जखमी चालकाला स्वतःच्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर वरद आयसीयू हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून डॉ. शैलेंद्र धेंडे यांनी स्वतः ॲम्बुलन्स चालवून मृत व्यक्ती व जखमींना पुढील उपचार व शवविच्छेदनासाठी वाई येथे हलविण्यात आले. या भीषण अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून भरधाव आणि बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच आपत्कालीन सेवांची अपुरी उपलब्धता हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निष्काळजी वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करून कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वाई पाचवड रस्त्याला बावधन ग्रामपंचायतीने बावधन गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या त्या रस्त्याला गतिरोधक टाका म्हणून वारंवार मागणी केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केले आहे अनेक वेळा मोठमोठे अपघात घडले आहेत याशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात शेती असल्याकारणाने लोकांची ये जा रस्ता ओलांडणे रस्त्याच्या शेजारी वस्ती असल्याकारणाने रहदारी मोठ्या प्रमाणात असते तरी ताबडतोब या रस्त्याला गतिरोधक टाकावे व होणारे अपघात टाळावे अशी विनंती युवा नेते विजयसिंह शशिकांत पिसाळ यांनी केली आहे
वाईतील लघु कुंभमेळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कृष्णाघाट परिसर भक्तिमय






