Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News: मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे न मिळाल्याने 17 वर्षीय मुलीची आत्महत्या; मन हेलावणारी घटना

पालघर जिल्ह्यातील विरार येथे मोबाईलचा डिस्प्ले दुरुस्त करण्यासाठी पैसे न मिळाल्याने नाराज झालेल्या 17 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. आर्थिक अडचणीमुळे आईला पैसे देता आले नव्हते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 03, 2026 | 08:43 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे न मिळाल्याने 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केली.
  • आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आईला तातडीने पैसे देता आले नाहीत.
  • विरार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला.
पालघर: पालघर जिल्ह्यातील विरार परिसरातून एक अत्यंत मन हेलावणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी घरातून पैसे न मिळाल्यानं नाराज झालेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण विरार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव अनिता महादेव सलगरे असे आहे. ती आपल्या आईसोबत विरार पूर्व येथील गडगापाडा परिसरात ‘आय जीवदानी दर्शन’ चाळीमध्ये राहत होती. तेव्हा रविवारी रात्री साधारण 10.45 वाजेच्या सुमारास जेव्हा घरात सर्व जण होते तेव्हा अनिताने आपल्या राहत्या घरातील खोलीत छताला असलेल्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेत आपले जीवन संपवले. जेव्हा हा प्रकार तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आला तेव्हा तिला तातडीने खाली उतरवले मात्र तिचा मृत्यू झाला होता.

Kolhapur Crime: कोल्हापुरात कॉलेज तरुणीवर चौघांकडून अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत वारंवार शोषण

मोबाईल दुरुस्त करण्यासाठी पैसे मिळाले नाही

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असता कुटुंबीयांची चौकशी केली. तेव्हा प्राथमिक तपासात अनिताच्या मोबाईलचा डिस्प्ले काही दिवसांपूर्वी खराब झाला होता. ती तो दुरुस्त करण्यासाठी आईकडे सतत पैशांची मागणी करत होती. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं तातडीने पैसे उपलब्ध करून देता आले नाहीत. याच कारणावरून अनिता काही दिवसांपासून नाराज आणि मानसिक तणावात होती. याच आर्थिक विवंचनेतून आणि रागाच्या भरात तिने रविवारी रात्री हे टोकाचे पाऊल उचलले.

विरार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवाल आणि पुढील सखोल तपासानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आधी लग्नाचे आमिष दाखवले, नंतर शारीरिक शोषण केलं आणि दोन वेळा गर्भपातासाठी भाग पडल्याचं समोर आलं आहे. एवढेच नाही तर तिला धर्मांतरासाठी ही दबाव टाकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी तरुणीने मीरा भाईंदरमध्ये काशिमीरा परिसरातील काशीगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Pune Crime : आळेफाट्यात बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, एकाला अटक; तब्बल…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत मुलीचे नाव काय होते?

    Ans: मृत मुलीचे नाव अनिता महादेव सलगरे (वय 17) असे होते.

  • Que: आत्महत्येमागचे प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: मोबाईलचा खराब डिस्प्ले दुरुस्त करण्यासाठी पैसे न मिळाल्याने ती मानसिक तणावात होती.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: विरार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Palghar news 17 year old girl commits suicide after being denied money for mobile repair a heart wrenching incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील
1

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली
2

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत
3

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

Pune Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; मिक्सरच्या वायरने गळा आवळून पती थेट पोलीस ठाण्यात
4

Pune Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; मिक्सरच्या वायरने गळा आवळून पती थेट पोलीस ठाण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.