पालघर: पालघरमधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. साखरपुडा झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला शरीर संबंधाची मागणी करण्यात आली. परंतु तिने नकार दिल्याने तिच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जव्हार पोलिसांनी सूत्र हलवत कोणतेही पुरावे नसतांना आरोपीला जेरबंद केले आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी निलेश आणि मृतक अल्पवयीन मुलीचे लग्न ठरले होते. त्यामुळे आरोपी निलेशचे घरी येणे- जाणे सुरु होते. बुधवारी सायंकाळी मृतक मुलीचे आई वडील शेतावरून घरी आले असता त्यांची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. ती कोणतीही हालचाल करत नसल्याचे त्यांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ती कोणताही प्रतिसाद देत नव्हती. तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती जव्हार पोलिसांना देण्यात आली, जव्हार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतकाचे मृतदेह ताब्यात घेतला.
याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने दिली. याआधारे गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. तपासा दरम्यान दुपारच्या वेळी मयत मुलीच्या घरी आरोपी निलेश धोंडगा आल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. या माहितीनुसार आरोपीचा शोध घेतला असता आरोपी जंगलात पळून गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी जंगलात शोध मोहीम राबवत आरोपी निलेश धोंडगा याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
आयुष कोमकर खून प्रकरणी मोठी अपडेट; बंडू आंदेकरसह 11 जणांवर थेट…
जळगावात 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत शेजाऱ्याच्या घरात सापडला
जळगाव जिल्ह्याच्या यावल शहरातील बाबूजी पुरा भागात एका ६ वर्षीय हनन खान याचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत शेजारच्या घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हनन खान हा शुक्रवारच्या सायंकाळपासून बेपत्ता होता आणि दुसऱ्या दिवशी शेजारच्या घरात सापडल्याने आता शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
नागरिकांत संतापाची लाट
मुलाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यामुळे, हननच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर संशय घेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली. संशयित आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी करत जमाव आक्रमक झाला. या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली असून, संपूर्ण बाबूजी पुरा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाल सुधारगृहातील मुलींनी काढला पळ; नीलम गोऱ्हेंनी केली कठोर कारवाईची मागणी