Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pawanraje Nimbalkar Case Verdict: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनी निकाल; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

बहुचर्चित पवनराजे हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने हा निकाल दिला. या निर्णयामुळे राज्यातील गाजलेल्या पवनराजे हत्याकांडाला नवे वळण मिळाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 20, 2026 | 01:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरण: महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी या प्रकरणातील माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 20 वर्षांनंतर आलेल्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निर्णयामुळे निंबाळकर कुटुंबासाठी हा मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

3 जून 2006 रोजी मुंबईहून धाराशिवकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा चालक समद काझी यांचाही मृत्यू झाला होता. दोन हल्लेखोरांनी पाठलाग करून गोळ्या झाडल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कळंबोली पोलिसांकडे, त्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेकडे आणि पुढे सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने या हत्येमागे राजकीय वैर असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 8 आरोपी होते. यामध्ये सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे यांचा समावेश होता.

Girish Mahajan: ‘मित्राच्या मुलीसोबतचे फोटो एडिट केले’; गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण, सायबर पोलिसांत तक्रार

न्यायालयाने पुराव्यांवर उपस्थित केले प्रश्न

निकाल वाचताना न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी तपासातील त्रुटींवर गंभीर निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने सांगितले की, हा खटला मुख्यतः माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांच्या जबानीवर आधारित होता. मात्र, त्यांच्या जबाबांमध्ये मोठी तफावत आढळून आली. न्यायालयाने म्हटले की, साक्षीदाराला पोलिसांनी बेकायदेशीर ताब्यात ठेवून कबुलीजबाब घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. हा पुरावा कायद्याच्या चौकटीत ग्राह्य ठरत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, तपास यंत्रणांनी आरोपींचे मोबाईल, कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक पुरावे योग्य पद्धतीने सादर केले नसल्याचेही न्यायालयाने सांगितले.

राजकीय वैर होते, मात्र पुरावे आवश्यक

न्यायालयाने पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय मतभेद असल्याचे मान्य केले. तेरणा साखर कारखाना आणि निवडणुकीच्या कारणावरून दोघांमध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, केवळ राजकीय वैमनस्याच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. त्यासाठी ठोस आणि विश्वासार्ह पुरावे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तपासातील त्रुटींवर न्यायालयाची नाराजी

न्यायालयाने तपासातील अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित केले. आरोपींमध्ये संपर्क असल्याचे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले कॉल डिटेल्स, मोबाईल पुरावे आणि इतर तांत्रिक माहिती तपास यंत्रणांनी योग्य प्रकारे सादर केली नसल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच, गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासंदर्भातील कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या जबानीमध्येही विसंगती आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले.

ओमराजे निंबाळकर कुटुंबाला मोठा धक्का

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या या न्यायालयीन लढाईचा निकाल अखेर 20 वर्षांनी आला आहे. निकालाच्या वेळी पवनराजे यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर निंबाळकर कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, या निकालावर ओमराजे निंबाळकर यांची पुढील भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune Crime: मूल होत नसल्याच्या टोमण्यांनी गाठलं टोक; पुण्यात 27 वर्षीय IT इंजिनिअर महिलेची आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड कधी घडले होते?

    Ans: 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

  • Que: या प्रकरणात न्यायालयाने काय निर्णय दिला?

    Ans: मुंबई सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

  • Que: आरोपींना निर्दोष मुक्त करण्यामागे न्यायालयाने कोणते कारण सांगितले?

    Ans: न्यायालयाने तपासातील त्रुटी, अपुरे पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती यामुळे आरोपींना दोषी ठरवता येणार नसल्याचे सांगितले.

Web Title: Pavanraje murder case all accused acquitted court verdict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Mp Omraje Nimbalkar

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
2

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.