काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव दीप्ती एकशिंगे (वय २७) असे होते. 17 जून रोजी तिने निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दीप्ती आणि प्रदीप एकशिंगे यांचा विवाह 17 नोव्हेंबर 2024 रोजी पुण्यात झाला होता. दीप्ती आणि प्रदीपची भेट आयटी कंपनीत काम करत असताना झाली होती. त्यांच्या व्यावसायिक ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर विवाहात झाले. मात्र ती काही दिवसांपासून तणावात होती.आणि अखेर तिने आत्महत्या केली. तिच्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Pune Crime)
या प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेले तिचे भाऊ डॉ. किरण दुधबळे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, लग्नानंतर दीप्तीला मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून वारंवार मानसिक छळ आणि टोमणे सहन करावे लागत होते. या सततच्या छळामुळे ती मानसिक तणावाखाली होती, ज्यातून अखेर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. (Pune Crime)
दीप्तीच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीप्तीचा पती प्रदीप एकशिंगे, सासू सुरेखा एकशिंगेसह इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime) पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
पुन्हा संसार वाचवण्यासाठी गेली, पण जीव गमावला; पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीची केली हत्या
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हवेली तालुक्यातील आर्वी गावात एका २५ वर्षय विवाहितेची ओढणीने गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. लग्नानंतरच्या अवघ्या काही महिन्यांतच पती-पत्नीमध्ये घरगुती वादाला सुरुवात झाली होती, याच वादातून ही हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
साक्षीदार होण्याच्या प्रयत्नात फसला, ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; दोघांना ठोकल्या बेड्या
Ans: दीप्ती यांनी सिंहगड रोड परिसरातील निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
Ans: मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू आणि नातेवाईकांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Ans: सिंहगड रोड पोलिसांनी पती प्रदीप एकशिंगे, सासू सुरेखा एकशिंगे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.






