तक्रारीत नेमकं काय?
या तक्रारीनुसार, फोटोशॉपद्वारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे त्यांच्या मित्राच्या मुलीसोबतचे फोटो मॉर्फ करून बदनामी करण्यात आली आहे. नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम व एक्स पोस्ट वरून मॉर्फ केलेले फोटो काढून टाकावेत. तसेच फोटो शेअर केलेल्या हँडल्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जलसंपदामंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटील यांनी केली आहे.
मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे बनावट एआय निर्मित फोटो तयार करून आणि आक्षेपार्ह मजकूर जोडून एका फेसबुक खातेदाराने सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५६, ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी अॅक्ट A) कलम ६६ (सी), ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. पोलिस निरीक्षक सतीश गोरडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. संबंधित फेसबुक खाते चालविणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
“मला माहिती नाही हे फोटो कसे मॉर्फ करण्यात आले. मी याबाबत सविस्तर खुलासा करणार आहे. मी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. फोटो मॉर्फिंग करुन ते दाखवले जात आहेत. सेल्फी दाखवले जात आहेत. पण ते मॉर्फिंग केलेले आहेत. मी यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी यावर सविस्तर खुलासा करेन”, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. (Girish Mahajan)
या फोटोत आक्षेपार्ह काय ते कळत नाही- गिरीश महाजन
बुलढाणा येथे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे फोटो पूर्णपणे बनावट आणि मॉर्फ (छेडछाड) केलेले असल्याचे स्पष्ट केले. याविरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘या फोटोत आक्षेपार्ह काय आहे ते कळत नाही. मागचे लोक कट करून मॉर्फ केलेले ते फोटो आहेत. याबाबत मुंबईतही तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर याबाबत सविस्तर भाष्य करणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.’
‘सहानुभूती आहे, पण दिलासा नाही’; फेरपरीक्षेला मनाई, विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Ans: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह फोटो प्रकरणाची चर्चा सुरू आहे.
Ans: त्यांनी हे फोटो बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचे सांगत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
Ans: सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून फोटो प्रसारित करणाऱ्या अकाउंट्सचा तपास सुरू आहे.






