Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime : रायगड हादरला! 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडीत 5 वर्षीय रिया सागर वाघमारे हिचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपास करत किरण भिकू वाघमारे या संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2026 | 06:50 PM
रायगड हादरला! 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

रायगड हादरला! 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • पेणमध्ये 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या
  • आरोपी पोलिसांच्या ताब्यात
  • बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह शेतात आढळला
विजय मोकल,पेण: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडीत पाच वर्षीय चिमुकलीच्या अपहरणानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत मुलीची ओळख रिया सागर वाघमारे (वय 5) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिया ही रात्री आई-वडिलांसोबत घरी झोपली होती. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास तिचे वडील जागे झाल्यानंतर रिया बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने त्यांनी तातडीने पेण पोलिसांना माहिती दिली.

दिघीतील ‘एमडी’च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. डॉग स्कॉडच्या मदतीने शोध घेत असताना सकाळी सुमारे आठच्या सुमारास घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावरील शेत परिसरात रियाचा मृतदेह आढळून आला.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली.

तपासादरम्यान पोलिसांनी किरण भिकू वाघमारे (वय 24) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील दुर्गम उंबरणेवाडी येथे शनिवारी घडलेली ही घटना शासनाच्या विकासाच्या दाव्यांना चपराक देणारी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उंबरणेवाडीतील गर्भवती मनीषा अनंत पारधी हिला अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते, मात्र गावापर्यंत वाहन जाऊ शकेल, असा रस्ताच नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही.

अखेर ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत बांबू आणि कापडाच्या साहाय्याने झोळी तयार केली. जीव धोक्यात घालून महिलेला खडतर डोंगररस्त्याने खांद्यावर वाहत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच उंबरणेवाडीसह परिसरातील सर्व दुर्गम वाड्यांना तातडीने सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा पक्का रस्ता, नियमित आरोग्य सेवा, रुग्णवाहिका सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Haryana Crime: तीन दिवसांपूर्वीच एकत्र राहायला आले…; प्रेयसीचा गळा चिरून हत्या, काही तासांतच प्रियकराने रेल्वेखाली मारली उडी

Web Title: Pen raigad five year old girl kidnapped and murdered accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • crime
  • pen
  • police

संबंधित बातम्या

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
1

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
2

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप
3

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
4

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.