Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिनी नागरिकाच्या संपर्कात राहून आखला फसवणुकीचा प्लान; पुण्यातील चित्रपट निर्मात्याला पोलिसांनी ठोेकल्या बेड्या

चायनीज नागरिकाच्या संपर्कात राहून सायबर फसवणुकीसाठी आपले बँक खाते पुरवणाऱ्या चित्रपट निर्मात्याला पिंपरी-चिंचवडच्या सायबर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 29, 2025 | 01:49 PM
पिंपरी गोळीबार प्रकरणातील अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

पिंपरी गोळीबार प्रकरणातील अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : राज्यात फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढत आहेत. चोरटे वेगवेगळे आमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची लूट करत आहेत. अशातच आता फसवणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या सायबर गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. चायनीज नागरिकाच्या संपर्कात राहून सायबर फसवणुकीसाठी आपले बँक खाते पुरवणाऱ्या चित्रपट निर्मात्याला पिंपरी-चिंचवडच्या सायबर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात ८६ लाखांपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच आणखी अनेकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.

फिर्यादी यांनी युट्युबवर शेअर केलेल्या स्टॉक मार्केट संदर्भातील व्हिडीओखालील व्हॉट्सअ‍ॅप लिंकवरून गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या अ‍ॅबॉट वेल्थ नावाच्या अ‍ॅपवर नोंदणी केली होती. सुरुवातीला ५०० रुपयांची गुंतवणूक करून त्यांना काही दिवसांत ५ कोटी १५ लाखांचे प्रॉफिट असल्याचे दाखवण्यात आले. पण पैसे काढण्याचा प्रयत्न करताच विविध चार्जेसच्या नावाखाली पैशांची मागणी होऊ लागली. त्यावरून संशय बळावल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात ५७,७०,६७० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.

बँक खात्याचा तपास आणि आरोपीचा शोध

तपासादरम्यान आरोपीने वापरलेले आईडीएफसी बँकेतील खाते हे “बालाजी इंटरप्रायझेस” या नावाने सुरू करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक सागर गोमन आणि त्यांच्या पथकाने डेक्कन पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. सुरुवातीला तो “मी चित्रपट निर्माता आहे, अशा गोष्टी कशा करीन?” असे उत्तर देत होता. मात्र पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी यांनी विश्वासात घेऊन केलेल्या सखोल तपासात त्याने चायनीज आरोपींच्या सांगण्यानुसार खाते उघडले व फसवणुकीसाठी वापरले, हे कबूल केले.

हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला

खात्यासंदर्भात 15 पेक्षा जास्त तक्रारी

आरोपीच्या खात्यावर एकूण ८६,४३,१११ रुपये जमा झाले होते आणि त्या खात्यावर १५ पेक्षा जास्त फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आरोपीच्या मोबाईलमध्ये आणखी दोन बँक खाती फसवणुकीसाठी तयार केल्याचे पुरावे मिळाले आहेत. वेळीच अटक केल्यामुळे इतर अनेक लोकांची फसवणूक टळली, असे पोलीसांनी सांगितले. आरोपीकडून 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, बँक खात्याची माहिती तपासणीसाठी घेतली आहे. तसेच चायनीज नागरिक बाम्बिनी आणि इतर सहआरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे हे करत आहेत.

Web Title: Pimpri chinchwads cyber crime branch has arrested a fraud accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • cyber crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी; कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया
2

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी; कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

लाटा पाहण्याच्या मोहापाई लोक अडचणीत येतात….: तुफान पावसामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आवाहन
3

लाटा पाहण्याच्या मोहापाई लोक अडचणीत येतात….: तुफान पावसामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आवाहन

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
4

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.