यवतमाळच्या पुसदमध्ये उधारीचे पैसे मागणाऱ्याला जबर मारहाण; चुलत्यालाही सोडलं नाही (File Photo : Crime)
नारायणगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. असे असताना आता आठवडाभरापूर्वी उसने दिलेले शंभर रुपये चारचौघांमध्ये परत मागितल्याच्या कारणावरून तसेच शिवीगाळ केल्यावरून एकाने डोक्यात लाकडी दांडका व दगड घालून हत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यातील नारायणगावात शुक्रवारी (दि.13) रात्री घडली.
हेदेखील वाचा : शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा चोरी; दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज चोरला
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल भाऊसाहेब गुळवे (वय 32, रा. शिपलापूर पानवडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, सध्या रा. बाजारतळ नारायणगाव) याने आठ दिवसांपूर्वी बाळू महादेव पोखरकर (वय ४१, रा. खोडद, ता. जुन्नर) याच्याकडून दारू पिण्यासाठी शंभर रुपये उसने घेतले होते. हे पैसे आठ दिवसांपासून सतत परत मागणे आणि शिवीगाळ केल्याच्या कारणावरून आरोपी गुळवे याचा पोखरकर याच्यावर राग होता. याला शुक्रवारी (दि.१३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बस स्थानकापासून नारायणगाव येथील मुक्ताई देवी यात्रा मैदानात ओढत नेऊन डोक्यात लाकडी दांडके व दगड घालून खून केला.
दरम्यान, नारायणगाव पोलिसांनी 24 तासांच्या आत ही घटना उघडकीस आणली. नारायणगाव बस स्थानकाजवळील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शीच्या जबावावरून आरोपीचा शोध घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बँकेच्या सुरक्षारक्षकाला जीवे मारण्याची धमकी
बँकेबाहेर थांबलेल्या सुरक्षा रक्षकाच्या छातीवर बसून चाकूच्या धाकाने जिवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार गुलटेकडी भागात गुरुवारी मध्यरात्री घडला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याबाबत विजय गायकवाड (५५, रा. शिवदर्शन) यांनी तक्रार दिली आहे. गुरुवारी (दि.१२) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
हेदेखील वाचा : एसटीची कमाई वाढली; महिला सन्मानसह अमृत योजनांमधून मिळाले मोठे उत्पन्न