Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोदाममधून तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

नगर रस्त्यावरील एक मोठे बंद गोदाम फोडून त्यातील २५ लाखांच्या तांब्याच्या तारा चोरून पसार झालेल्या टोळीला वाघोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 01, 2025 | 04:40 PM
गोदाममधून तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोदाममधून तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. असातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नगर रस्त्यावरील एक मोठे बंद गोदाम फोडून त्यातील २५ लाखांच्या तांब्याच्या तारा चोरून पसार झालेल्या टोळीला वाघोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांकडून ६ लाख ४० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा तसेच टेम्पो असा २४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राजेंद्र मोतीचंद जैन (वय ५२, रा. माणकेश्वर बिल्डींग, मुंबई), विनोद श्रीपाल जैन (वय ४०, रा. कामाठीपूरा, मुंबई), सोहेल फिरोज शेख (वय २२, रा. रे रोड, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक वैजीनाथ केदार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

वाघोली-लोहगाव रस्त्यावरील जैन वेअर हाऊस, रिमश्री कॉपर इंडिया प्रा. लि. या गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी घडली होती. तांब्याच्या तारा चोरुन आरोपी टेम्पोतून पसार झाले होते. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाघोली पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून आरोपींचा माग काढण्यात येत होता. पोलिसांनी जवळपास १७२ ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तांत्रिक तपास, तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन पोलिसांनी आरोपींचा माग काढला. आरोपी जैन आणि शेख यांच्याकडून सहा लाख ४० हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि १८ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला.

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानक, पुणे स्टेशनचा परिसर त्यासोबतच वाकडेवाडी बस स्थानकाच्या आवारातून गर्दीत आलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरी करणार्‍या दोन चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांकडून १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तुषार अविंता लोखंडे (वय २०), गणेश संजय पोकळे (वय २३, रा. दोघेही. पाटील इस्टेट शिवाजीनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, अशोक पाटील, पोलीस हवालदार अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, कर्मचारी प्रशांत टोणपे, सुजय पवार यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Police have arrested a gang that stole copper wires from a warehouse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • Arrested News
  • cmomaharashtra
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.