Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन महिलांना गंडवले; बिहारच्या टोळीचा पर्दाफाश

सोन्याची बनावट बिस्किटे देऊन वृद्ध महिलांकडील सोन्याचे खरे दागिने लुटणाऱ्या बिहारच्या टोळीचा कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 05, 2025 | 12:30 AM
बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन महिलांना गंडवले; बिहारच्या टोळीचा पर्दाफाश

बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन महिलांना गंडवले; बिहारच्या टोळीचा पर्दाफाश

Follow Us
Follow Us:

कराड : सोन्याची बनावट बिस्किटे देऊन वृद्ध महिलांकडील सोन्याचे खरे दागिने लुटणाऱ्या बिहारच्या टोळीचा कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली, तर, पाच जण पसार झाले. अटक केलेल्या चोरट्याकडून पोलिसांनी दीड तोळ्याची सोन्याची साखळी हस्तगत केली आहे.

विरेंद्र साहू (वय ३२, मूळ रा. बिहार, सध्या रा. कऱ्हाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील बेलवडे येथील अनिता अशोक तर्टे यांना दोन दिवसांपूर्वी कराड येथील बस स्थानक परिसरात भामट्यांनी बनावट सोन्याचे बिस्किट देऊन त्यांची दीड तोळ्याची सोन्याची चैन लुटली होती. याबाबत अनिता तर्टे यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली.

गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह उपनिरीक्षक आंदलकर, धीरज कोरडे, मोहसीन मोमीन, अनिल स्वामी, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ, अमोल देशमुख यांना गुन्ह्याचा तपास करताना शिराळा व पलूसमध्येही अशाच चोऱ्या झाल्याचे लक्षात आले. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचला. यात सहा जणांची टोळी असल्याचे समोर आले. सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा  :Pune Crime : गुन्हे शाखेच्या युनिट एकची मोठी कारवाई; गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

कराडमधील राहत्या घरावर छापा

या टोळीच्या कराड येथील राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी विरेंद्र साहू पोलिसांच्या हाती लागला, तर अन्य पाच जण पसार झाले. पळून गेलेल्या पाच जणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या टोळीने साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही गुन्हे केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अन्यही काही जिल्ह्यांत गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.

हे सुद्धा वाचा : कोयत्याचा धाक दाखवून लूट, दुकानाचीही केली तोडफोड; शिक्रापुरात नेमकं काय घडलं?

घरातून पॉलिश पावडर जप्त

पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वी सुमारे अर्धा तास आधी टोळीतील पाचजण घरातून बाहेर गेले होते. अर्ध्या तासापूर्वी पोलिसांनी छापा टाकला असता, तर संपूर्ण टोळीच पोलिसांच्या हाती लागली असती. पोलिसांच्या हाती लागलेल्या विरेंद्र साहू यानेही पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडून गोल्ड पॉलिश, चांदी पॉलिश पावडर आणि सोन्यासारखे दिसणारे बिस्किट जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Police have arrested a man who cheated women by giving them fake gold biscuits nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Satara Police

संबंधित बातम्या

जतमध्ये रास्ता रोकोप्रकरणी दोन माजी आमदारांसह ७० जणांवर गुन्हा; बंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोप
1

जतमध्ये रास्ता रोकोप्रकरणी दोन माजी आमदारांसह ७० जणांवर गुन्हा; बंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोप

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?
2

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या
3

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक कारणही समोर
4

भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.