Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तु एसटी पुढे न्यायची नाही, नाहीतर…; चालकाला कुऱ्हाडीचा धाक दाखवणाऱ्याला ठोकल्या बेड्या

एसटीला दुचाकी आडवी मारत एसटी चालकास कुऱ्हाडीसह सत्तुराचा धाक दाखवून तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी एकाने दिली होती. ५ मार्च २०२५ रोजी उंब्रज (ता. कराड) येथे ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 08, 2025 | 01:24 PM
तु एसटी पुढे न्यायची नाही, नाहीतर...; चालकाला कुऱ्हाडीचा धाक दाखवणाऱ्याला ठोकल्या बेड्या

तु एसटी पुढे न्यायची नाही, नाहीतर...; चालकाला कुऱ्हाडीचा धाक दाखवणाऱ्याला ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

उंब्रज : एसटीला दुचाकी आडवी मारत एसटी चालकास कुऱ्हाडीसह सत्तुराचा धाक दाखवून तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी एकाने दिली होती. ५ मार्च २०२५ रोजी उंब्रज (ता. कराड) येथे ही घटना घडली आहे. अवघ्या एका तासात सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन एसटीचालकास धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. राहुल मोहन आटोळे (वय २४ रा. उंब्र, ता. कराड जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मनोज अशोकराव पाटील (वय ३८, रा. ढेबेवाडी, ता. पाटण) यांनी पाटण ते सातारा एसटी उंब्रजसेवा रस्त्या लगत प्रवासी उतरवण्यासाठी ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता थांबवली. यावेळी संशयित राहूल आटोळे हा वेगाने दुचाकी घेऊन तिथे आला. त्याने त्याची दुचाकी एसटीला आडवी लावून तो कुऱ्हाड व सत्तुर घेऊन चालकाच्या दिशेने धावला. तु एसटी पुढे न्यायची नाही. एसटी पुढे नेली तर तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत कुऱ्हाड व चाकुचा धाक दाखवला. सुमारे १५ मिनिटे हा प्रकार भररस्त्यात सुरू होता.

उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे पोलीस पथकासह घटनास्थळाकडे रवाना झाले, मात्र तोपर्यंत संशयित पसार झाला होता. भोरे यांनी घटनास्थळावर माहिती घेऊन मनोज पाटील यांना तत्काळ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. भोरे यांनी स्वतः संशयिताच्या तपासासाठी रवाना होत अन्य दोन पथके रवाना केली. यामधे पोलीस उपनिरीक्षक खबाले, कॉन्स्टेबल संजय धुमाळ, हवालदार पवार, श्रीधर माने, राजकुमार कोळी यांचा सहभाग होता. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या एका तासांच्या आत संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या मुसक्या आवळत त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई केली. कायद्याचे उल्लंघन करून धाक दाखविणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिला आहे.

Web Title: Police have arrested a man who threatened a bus driver with an axe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Satara Police
  • st bus

संबंधित बातम्या

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
2

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
3

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
4

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.