Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; नागपूरमधील तरुणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विवाहाच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एक ज्येष्ठ नागरिकाची साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागपूरमधील तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 24, 2025 | 01:39 PM
विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; नागपूरमधील तरुणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; नागपूरमधील तरुणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या
  • विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक
  • नागपूरमधील तरुणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातील नागरिकांना चोरटे गंडा घालत आहेत. फसवणुकीच्या प्रकारांना बळी न पडण्याचे आवाहन वेळोवेळी नागरिकांना केले जात असले तरीही घटना थांबताना दिसत नाही. असातच आता विवाहाच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एक ज्येष्ठ नागरिकाची साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागपूरमधील तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीकडून पोलिसांनी रोकड जप्त केली आहे.

हर्षला राकेश डेंगळे (वय २८, रा. न्यू ओमनगर, हुडकेश्वर रोड, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बेंद्रे, पोलिस कर्मचारी संतोष जाधव, विशाल जाधव, मेधा गायकवाड, प्रतीक करंजे यांनी ही कामागिरी केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी एका वृत्तपत्रात विवाह विषयक जाहिरात वाचली होती. या जाहिरातीतील संपर्क क्रमांकावर त्यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी संपर्क साधला. त्यानंतर ममता जोशी असे नाव आरोपी हर्षला डेंगळेने त्यांना सांगितले. त्यानंतर तिने ज्येष्ठ नागरिकाला जाळ्यात ओढले. ‘तेव्हा कोल्हापूरला आले आहे. माझ्या मावसबहिणीचा अपघात झाला. उपचारासांठी तातडीने पैशांची गरज आहे. पुण्यात परत आल्यानंतर पैसे करते’, असे डेंगळेेने त्यांना सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तिने ज्येष्ठ नागरिकाकडून वेळोवेळी अकरा लाख ४७ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करुन घेतले.

त्यानंतर डेंगळेने वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने १ जून रोजी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात आला. तांत्रिक तपासात आरोपी हर्षला डेंगळेने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. ती नागपूरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून तीन मोबाइल, तसेच ११ लाख ४५ हजार रुपये जप्त करण्यात आले. अटक करण्यात आल्यानंतर तिला शिवाजीनगर न्यायालयात हजर करुन तिच्याविरुद्ध अराोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालायने तिला जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Police have arrested a young woman from nagpur who cheated on the promise of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Froud News
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

‘मला शोधू नको, आईची काळजी घे’; चिठ्ठी लिहून तरुण झाला बेपत्ता
1

‘मला शोधू नको, आईची काळजी घे’; चिठ्ठी लिहून तरुण झाला बेपत्ता

कोंढव्यात टोळक्याची दहशत, दुकानाची तोडफोड; सायंकाळी नेमकं काय घडलं?
2

कोंढव्यात टोळक्याची दहशत, दुकानाची तोडफोड; सायंकाळी नेमकं काय घडलं?

धक्कादायक ! डोक्यात लाकडी दांडके मारुन महिलेचा खून; कारण काय तर…
3

धक्कादायक ! डोक्यात लाकडी दांडके मारुन महिलेचा खून; कारण काय तर…

फटाके वाजवताना वाद, तरुणावर शस्त्राने वार; रात्री नेमकं काय घडलं?
4

फटाके वाजवताना वाद, तरुणावर शस्त्राने वार; रात्री नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.