Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुगलवरून पत्ता शोधून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींना ठोकल्या बेड्या

गुगलवरून व्यावसायिक कार्यालयांचे पत्ते शोधून, ठाण्यातून बस-रिक्षा वापरून पिंपरी-चिंचवड शहरात चोरी करण्यासाठी येणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट ४ ने अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 25, 2025 | 04:36 PM
गुगलवरून पत्ता शोधून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींना ठोकल्या बेड्या

गुगलवरून पत्ता शोधून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुगलवरून व्यावसायिक कार्यालयांचे पत्ते शोधून, ठाण्यातून बस-रिक्षा वापरून पिंपरी-चिंचवड शहरात चोरी करण्यासाठी येणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट ४ ने अटक केली आहे. सलीम सिकंदर शेख (वय.५८) आणि अजित अर्जुन पिलई (वय.४२, दोघेही रा.वांगणी गोरेगाव, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी चोरी करताना मोबाईल फोन बंद ठेवत असत, जेणेकरून त्यांचा मागोवा घेता येऊ नये. त्यांच्याकडून २ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी काळेवाडीतील कोकणे चौकात पाचव्या मजल्यावरील एका व्यावसायिक कार्यालयात चोरी झाली होती. येथून ३६ हजार रुपये चोरीस गेले होते. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने तब्बल ४०० सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले आणि आरोपींपर्यंत पोहोचले. यानंतर २० एप्रिल रोजी रात्री काळेवाडीत दोघे संशयित पायी फिरताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, प्रवीण दळे यांच्यासह पथकातील विविध अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही कामगिरी पार पाडली.

दोन्ही आरोपी अट्टल गुन्हेगार

या घरफोडीसंदर्भात अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यामधील सलीम शेख याच्यावर मुंबईत ६२ घरफोडीचे गुन्हे नोंद असून १० नॉन बेलेबल वॉरंटही प्रलंबित आहेत. तर अजित पिलई याच्यावर २० गुन्हे दाखल असून तो उच्च शिक्षित आहे. तो गुगलवरून टार्गेट निवडत असे.

Web Title: Police have arrested and taken action against 2 burglars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 04:36 PM

Topics:  

  • Arrested News
  • cmomaharashtra
  • crime news
  • House Theft
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…
1

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…
2

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?
3

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात
4

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.