Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात अक्षय म्हस्केवर गोळीबार करणार्‍या पाच जणांना ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून घेतले ताब्यात

टोळी युद्धाच्या वर्चस्व तसेच बदल्याच्या भावनेतून आंदेकर टोळीकडून झालेल्या तिसऱ्या खूनाच्या प्रयत्नातील फरार आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले. तत्पुर्वी हे तरुण आंदेकर टोळीचे नंबरकारी (सदस्य) असल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 21, 2026 | 08:10 PM
पुण्यात अक्षय म्हस्केवर गोळीबार करणार्‍या पाच जणांना ठोकल्या बेड्या; 'या' परिसरातून घेतले ताब्यात

पुण्यात अक्षय म्हस्केवर गोळीबार करणार्‍या पाच जणांना ठोकल्या बेड्या; 'या' परिसरातून घेतले ताब्यात

Follow Us
Follow Us:

पुणे : टोळी युद्धाच्या वर्चस्व तसेच बदल्याच्या भावनेतून आंदेकर टोळीकडून झालेल्या तिसऱ्या खूनाच्या प्रयत्नातील फरार आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले. तत्पुर्वी हे तरुण आंदेकर टोळीचे नंबरकारी (सदस्य) असल्याचे समोर आले असून, एक आरोपी मोक्कातील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांना कार्ला येथील एकविरा देवीच्या डोंगरावरून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या गोळीबाराने शहरात मोठी खळबळ उडाली होती.

 

वनराज आंदेकरच्या खूनातील आरोपीचा भाऊ अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६) याच्यावर गोळीबार झाला. यामध्ये अक्षय हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
आफ्ताफ शरीफ सय्यद (रा. भाग्यदेवनगर, वैशाली नर्सिंग होम, कोंढवा खुर्द), ऋषी प्रसाद मोहन आंबट (वय २१, रा. चुडामण तालीमजवळ, नाना पेठ), आवेज अशपाक शेख (वय २६, रा. गणेश पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय १९, रा. भवानी पेठ, पालखी विठोबा चौक), अमन फारूक बागवाले (वय २१, रा. गोल्डन ग्रेस, भवानी पेठ) अशी गुन्हेगारांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अक्षय मस्के याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याची पत्नी करुणा अक्षय मस्के (वय २२, रा. स्वामी समर्थनगर, आंबेगाव पठार) यांनी सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.

वनराज आंदेकर याचा खून सोमनाथ गायकवाड टोळीकडून १ सप्टेंबर २०२४ रोजी झाला होता. टोळी युद्धाच्या संघर्षातून हा खून झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. नंतर आंदेकर टोळीकडून दोन खून घडवून आणले. नंतर आता तिसऱ्या खूनाचा प्रयत्नात अक्षय मस्के याच्यावर गोळीबार व तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर आरोपी पसार झाला होते.

दरम्यान, गुन्हे शाखेसह परिमंडळ दोन व एकमधील पथकांकडून आरोपींचा शोध सुरू होता. पोलिसांनी ऋषी आंबट याच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांनी ही मुले आदल्या दिवशी कार्ला येथील एकविरा देवीला गेले होते. ते आताही एकविरा देवीला गेले असण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक अजित जाधव व त्यांच्या पथकाने कार्ला येथील एकविरा देवीच्या डोंगरावर शोध घेऊन ६ जणांना ताब्यात घेतले. बंडु आंदेकर व इतरांनी संगनमत करुन वनराज आंदेकर यांच्या खुनाचा सुड घेण्यासाठी कट रचला, असल्याचे समोर आले आहे.

आवेज शेख मोक्कातील आरोपी

कोंढवा भागात गोळीबारप्रकरणात कृष्णा आंदेकरसह टोळीवर मोक्का कारवाई केली होती. नंतर आवेज शेखचा सहभाग होता. तो मोक्कातून जामीनावर बाहेर आला असून, तो आंदेकर टोळीच नंबरकारी (सदस्य) आहे. कृष्णा आंदेकरने या आरोपींना पिस्तूल पुरवले होते. तर, आवेजसोबत इतर अटक केलेली मुल ही कृष्णा तसेच स्वराज यांच्यासोबत असत, या मुलांना घेऊन आवेज याने या खूनाचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

वनराज आंदेकर यांचा खुन करण्यासाठी पिस्तुल पुरविल्याबद्दल आकाश मस्के याला पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. त्याचा भाऊ अक्षय मस्के हा रिक्षा चालवतो. तो रिक्षा घेऊन बालाजीनगर येथील राजश्री शाहु बँक चौकात बुधवारी २० मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळीबार करुन कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. अक्षय मस्के याला तातडीने भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यात येत असून, अजूनही तो बेशुद्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : चोरी करुन पळालेल्या ‘त्या’ आरोपींची गाडी पोलिसांना सापडली; आयफोनसह सात माेबाईलही हस्तगत

Web Title: Police have arrested five people who opened fire on akshay mhaske in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

Kupwad Double Murder Case:  कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक; सांगली-कुपवाडमध्ये बंदची हाक
1

Kupwad Double Murder Case: कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक; सांगली-कुपवाडमध्ये बंदची हाक

Delhi Crime: अवघे पाऊणशे वयोमान! डेटिंग App वरून 67 वर्षाच्या पुरुषाशी केली महिलेे मैत्री, डिनर डेटवर गेली अन्…
2

Delhi Crime: अवघे पाऊणशे वयोमान! डेटिंग App वरून 67 वर्षाच्या पुरुषाशी केली महिलेे मैत्री, डिनर डेटवर गेली अन्…

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात
3

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात

Madhya Pradesh Crime : मस्करीतून सुरु झाला वाद अन् थेट चाकू हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला मुस्कान हत्याकांड
4

Madhya Pradesh Crime : मस्करीतून सुरु झाला वाद अन् थेट चाकू हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला मुस्कान हत्याकांड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.