Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; लष्कर पोलिसांच्या पथकाची कारवाई

लष्कर तसेच कोंढवा भागात बंद घरे फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 26, 2025 | 12:30 AM
घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; लष्कर पोलिसांच्या पथकाची कारवाई

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; लष्कर पोलिसांच्या पथकाची कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लष्कर तसेच कोंढवा भागात बंद घरे फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली असून, दोन गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

दोन गुन्हेगार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. आर्यन अजय माने उर्फ मॉन्टी (वय २१, रा. फुरसुंगी) व विशाल मारूती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) व ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, उपनिरीक्षक राहुल घाडगे, रमेश चौधर व त्यांच्या पथकाने केली आहे.

आर्यन माने व ओमकार गोसावी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर हडपसर, वानवडी व लोणीकंद या पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. शहरात वाढलेल्या गुन्हेगारी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त व पेट्रोलिंगवर भर दिला जात आहे. दरम्यान, लष्कर पोलिस ठाण्यात एका ऑफिसमध्ये घुसून चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यामध्ये आरोपी कैद झाले होते.

माहिती घेत असताना पोलिस अंमलदार सागर हराळ व लोकेश कदम यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, या तिघांना पथकाने पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. अधिक तपासात त्यांच्याकडून कोंढव्यात देखील घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. लष्कर पोलिस अधिक तपास करत आहेत.

धनकवडीत वाहने फोडणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

पुण्यातील धनकवडीत वाहनांची तोडफोड करणार्‍या टोळक्याला सहकारनगर पोलिसांनी पकडून कारवाई केली आहे. त्यात एक सराईत असून, तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, मित्राला भेटायला आल्यानंतर दारुच्या नशेत टोळक्याने वाहने फोडल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. रोहीत कैलास आढाव (वय २१, रा.किरकीटवाडी), सुधीर बाप्पु सावंत (वय १९, रा.गोरावी वस्ती, नांदेड फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील आढाव रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी तिघा अल्पवयीन साथीदारांच्या साथीने वाहन-तोडफोड केली होती. ही कारवाई पोलिस उपायुक्त मिलींद मोहीते, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पवार, सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Police have arrested thieves who broke into houses and stole

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Theft Cases

संबंधित बातम्या

Twisha Sharma Case: ट्विशाच्या पतीला जबलपूरमध्ये अटक; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश
1

Twisha Sharma Case: ट्विशाच्या पतीला जबलपूरमध्ये अटक; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश

रावेत गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट, बिष्णोई गँगने जेलमधूनच दिली सुपारी; अडीच लाखात डील अन्…
2

रावेत गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट, बिष्णोई गँगने जेलमधूनच दिली सुपारी; अडीच लाखात डील अन्…

अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल
3

अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल

Crime News: सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या
4

Crime News: सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.