Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्योजकाच्या 44 तोळे दागिन्यांवर चालकानेच मारला डल्ला; पोलिसांनी 12 तासात ठोकल्या बेड्या

उद्योजक राजीव जयकुमार पाटील यांच्या बंगल्यात गुरुवारी भरदिवसा झालेल्या सशस्त्र चोरीचा शुक्रवारी पोलिसांनी उलगडा केला आहे. चालकानेच मालकाच्या ४४ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे समाेर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 15, 2025 | 12:33 PM
उद्योजकाच्या 44 तोळे दागिन्यांवर चालकानेच मारला डल्ला; पोलिसांनी 12 तासात ठोकल्या बेड्या

उद्योजकाच्या 44 तोळे दागिन्यांवर चालकानेच मारला डल्ला; पोलिसांनी 12 तासात ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : सम्राटनगरातील उद्योजक राजीव जयकुमार पाटील यांच्या बंगल्यात गुरुवारी भरदिवसा झालेल्या सशस्त्र चोरीचा शुक्रवारी पोलिसांनी उलगडा केला आहे. चालकानेच मालकाच्या ४४ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे समाेर आले आहे. चालकासह त्याच्या साथीदाराला अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकत दोघांकडून ५० लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्रकाश दत्तात्रय चौगुले (वय ३८, रा. हंचनाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) व अमित विश्वनाथ शिंदे (वय २५, यादवनगर, डवरी वसाहत, कोल्हापूर) या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांनी दिली.

सम्राटनगर येथे पाटील यांचा बंगला आहे. गुरुवारी ते कुटुंबीयांसह गोकुळ शिरगाव येथील आपल्या फर्ममध्ये गेले होते. घरात त्यांचा एकच वृद्ध नातेवाईक होता. दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास दोन हेल्मेटधारी बंगल्यात घुसले. त्यांनी बंगल्यातील वृद्धाला चाकूचा धाक दाखवत बेडरूममधील कपाटात सोन्याचे दागिने, रोकड ठेवलेले तीन डिजिटल लॉकर घेऊन मोपेडवरून धूम ठोकली. या घटनेची राजारामपुरी पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा नोंद झाली. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजवरुन शाेध

बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या चाव्या घेऊन ही चोरी करण्यात आल्याने चोरटे माहितगार असावेत, असा अंदाज बांधून पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी सहा वर्षांपासून चालक म्हणून काम करणारा प्रकाश चौगुले याचा मोबाईल बंद आढळला. त्याचा शोध घेऊनही ठावठिकाणा सापडत नव्हता. सीसीटीव्हीतील फुटेजमधील चोरट्यांच्या हालचालीने प्रकाशवरील संशय बळावला. त्यात पोलिस अंमलदार सुरेश पाटील यांनाही प्रकाश यानेच साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती मिळाली. प्रकाश पुणे-बंगळूर महामार्गावर येणार असल्याची माहिती मिळताच मध्यरात्री सापळा रचला. लक्ष्मी टेकडीजवळ तो मोटारीतून येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

कर्ज फेडण्यासाठी रचला कट

प्रकाश याची गॅरेजमध्ये काम करणाऱ्या अमित याच्याशी ओळख झाली होती. दोघेही कर्जबाजारी होते. मोठी चोरी करून कर्ज फेडून उरलेल्या रकमेतून व्यवसाय करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी त्यांनी कट रचला. नेहमी बंगल्यात येणे-जाणे असल्याने प्रकाशला बेडरूममधील लॉकरमध्ये सोन्याचे दागिने, रोकड असल्याची माहिती होती. घरात कोणी नसल्याचे समजताच गुरुवारी त्यांनी डल्ला मारला.

Web Title: Police have arrested two people for stealing jewellery from a businessman in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • Arrested News
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • House Theft
  • Kolhapur Police

संबंधित बातम्या

बुलढाण्यातील कुख्यात गुंड बाब्याची निर्घृण हत्या, आरोपींनी चाकू खुपसला अन्…; भर रस्त्यात थरार
1

बुलढाण्यातील कुख्यात गुंड बाब्याची निर्घृण हत्या, आरोपींनी चाकू खुपसला अन्…; भर रस्त्यात थरार

Sindhudurg Crime : शहरात वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती; मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर
2

Sindhudurg Crime : शहरात वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती; मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

अमरावतीच्या बडनेरात धारदार शस्त्राने वार करून लिपिकाची हत्या; रस्त्यावर फेकून दिला मृतदेह अन्…
3

अमरावतीच्या बडनेरात धारदार शस्त्राने वार करून लिपिकाची हत्या; रस्त्यावर फेकून दिला मृतदेह अन्…

Crime News : टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात दगड घातला अन्…
4

Crime News : टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात दगड घातला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.