
रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल
हिंगोली : हिंगोली शहरात पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.२९) सकाळी साडेआठच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली. अमोल गंगलवाड (वय ५०) असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्यांनी पोलिस गणवेशातच टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
अमोल गंगलवाड हे शनिवारी सकाळी खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली आले होते. रेल्वे पुलाजवळ येताच त्यांनी अचानक रेल्वेसमोर उडी घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वेच्या लोको पायलटने घटनेची माहिती तात्काळ स्टेशन मास्तरांना दिली. त्यानंतर हिंगोली पोलिसांना माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण लोढा, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक कुमार मस्के, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
बनावट पदव्यांचा मास्टरमाईंड ताब्यात, नागपूर येथून केली अटक; महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता
दरम्यान, गंगलवाड यांची दोन महिन्यांपूर्वीच परभणी येथून हिंगोली जिल्हा पोलिस दलात बदली झाली होती. सध्या ते पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी विविध बाबींची चौकशी केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या
किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद होऊन अबोला झाला. या तणावातून नंदिनी मंगलकर (वय ४५, रा. मिरे ले-आऊट, नंदनवर) हिने घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदीनीचे पती महेश व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. घटनेच्या पाच दिवसांपूर्वी पती-पत्नीत क्षुल्लक वाद झाला. नंदीनीने मनावर ताण घेतला. दोघांत अबोला आणि दुरावा वाढला. परंतु, तिला हे सहन झाले नाही. त्यानंतर तिने आत्महत्या केली.