Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

परदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी बेकायदा कॉल सेंटर चालविणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2026 | 12:00 PM
लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
  • तब्बल २० जणांना अटक
  • ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
वडगाव मावळ/सतिश गाडे : परदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी बेकायदा कॉल सेंटर चालविणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मावळ तालुक्यातील नांगरगाव येथील ओमेगा सोसायटीमधील ‘देव व्हिला’ बंगल्यावर छापा टाकून पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. या कारवाईत मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि चारचाकी वाहनांसह एकूण ३६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

नांगरगाव परिसरातील एका बंगल्यात काही व्यक्ती एकत्र येऊन बेकायदा कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तपासाला वेग आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला.

पोलिसांनी पंचांसमक्ष बंगल्यात प्रवेश केला असता, काही व्यक्ती हेडफोन लावून लॅपटॉप आणि मोबाईलच्या साहाय्याने इंग्रजीत संभाषण व चॅटिंग करताना आढळल्या. लगतच्या खोलीतही अशाच प्रकारचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे कॉल सेंटर चालविण्यासाठी आवश्यक अधिकृत परवानगीची समाधानकारक कागदपत्रे आढळून आली नाहीत.

अमेरिका, कॅनडातील नागरिकांना लक्ष्य

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी इंटरनेट कॉलच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांशी संपर्क साधत होते. अ‍ॅमेझॉन, गुगल यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध योजनांचे आमिष दाखविले जात होते.

नागरिकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यांची माहिती, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डसंबंधी तपशील मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या माहितीचा वापर करून बनावट बँकसंबंधित कागदपत्रे तयार केली जात असल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पार्सलच्या नावाखाली भीती दाखवून फसवणूक

काही नागरिकांना त्यांच्या नावाने मागविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून भीती दाखविली जात होती. अशा प्रकारे नागरिकांना मानसिक दबावाखाली आणून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीची पद्धत उघड करण्यासाठी पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोन व लॅपटॉपची तपासणी सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा : नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि इंडियन टेलिग्राफ कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, ते पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते तसेच दोन्ही पथकांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश कुठे करण्यात आला?

    Ans: मावळ तालुक्यातील नांगरगाव येथील ओमेगा सोसायटीमधील ‘देव व्हिला’ बंगल्यावर छापा टाकून पोलिसांनी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.

  • Que: या प्रकरणात किती जणांना अटक करण्यात आली?

    Ans: पुणे ग्रामीण पोलिसांनी या कारवाईत २० जणांना अटक केली आहे.

  • Que: पोलिसांनी किती रुपयांचा मुद्देमाल जप्त केला?

    Ans: पोलिसांनी मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि चारचाकी वाहनांसह एकूण ३६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: The police have busted a fake call center in lonavala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maval news

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण
2

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
3

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
4

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.