Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Accident: जुन्नरमध्ये भीषण अपघात! हायवा-कार समोरासमोर धडक; नायब तहसीलदारांचा मृत्यू, दोघे जखमी

जुन्नर तालुक्यात हायवा आणि कारच्या भीषण अपघातात नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले असून अपघात एस कॉर्नरवर झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2026 | 12:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हायवा-कार समोरासमोर धडक; भीषण अपघात
  • नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा मृत्यू
  • दोन जण जखमी; पोलिसांकडून तपास सुरू
पुणे: पुणे जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. बनकरफाटा–जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर हायवा आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. या अपघातात निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. तर महसूल विभागातील कर्मचारी विजय खर्तोडे (वय 48) हे गंभीर जखमी झाले असून तुषार भीमराव कोरडे (वय 35) हे किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना जुन्नर तालुक्यात घडली.

Buldhana Crime: DJ वर नाचताना धक्का लागल्यावरून वाद; 23 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

कसा झाला अपघात ?

महसूल अधिकाऱ्यांची Honda City (कार क्रमांक MH 12 FF 6423 ) ही कार बनकरफाट्याकडून जुन्नरकडे जात होती. त्याचवेळी पांगरीमाथ्याकडून येणाऱ्या हायवाची (क्रमांक-MH 14 K00812) हा एस कॉर्नरवर समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कार फिरून उलट दिशेला वळली. यात निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. तर महसूल विभागातील कर्मचारी विजय खर्तोडे (वय 48) गंभीर जखमी झाले असून तुषार भीमराव कोरडे (वय 35) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. येथून प्रवास करणारे पत्रकार अरुण मोरे यांनी या जखमींना आपल्या कार मध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पुढील उपचारासाठी पुण्याकडे नेत असतांना अनंता गवारी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

वरातीत नाचण्याच्या वादातून भावाचीच हत्या; चार आरोपींना अटक

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी राग मनात धरून भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव तेजस पिलाने असे आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलिसांनी पाठलाग करून चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime: संतापजनक प्रकार! चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून अश्लील कृत्य; आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: जुन्नर तालुक्यातील गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर.

  • Que: या अपघातात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune accident horrific crash in junnar head on collision between hyva truck and car deputy tehsildar dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Pune Accident
  • Pune Crime

संबंधित बातम्या

‘रॉ अधिकारी’ असल्याचे सांगून सव्वाचार लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले
1

‘रॉ अधिकारी’ असल्याचे सांगून सव्वाचार लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले

पुण्यातील तोतया पत्रकाराला बेड्या, महिला पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

पुण्यातील तोतया पत्रकाराला बेड्या, महिला पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Hyderabad Crime: संतापजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काका आणि दोन सावत्र भावांनी केला अत्याचार
3

Hyderabad Crime: संतापजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काका आणि दोन सावत्र भावांनी केला अत्याचार

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
4

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.