Taloja Firing Case: तळोजा गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी पुण्यातून ताब्यात; आंबेगाव पोलिसांची कारवाई
याबाबत चैतन्य अतुल वज्रमुष्ठी (वय ३१, रा. मोरया क्रिस्टल सोसायटी, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तक्रारदाराने भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्याने आरोपींनी तक्रारदार तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुण आणि त्याची पत्नी याबाबतची तक्रार देण्यासाठी दुचाकीवरुन पोलीस ठाण्यात निघाले.
दुचाकीस्वार तरुणाला दोघांनी अडवले. ‘श्वानावरुन आमच्या घरातील महिलांना मारहाण का केली?’, अशी विचारणा आरोपींनी केली. आरोपींनी तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. तरुण आणि त्याची पत्नी जीव वाचविण्यासाठी तेथून पळाले. आरोपींनी तरुणाचा पाठलाग करुन मारहाण केली. तरुणाच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी तिला मारहाण केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
पुणे, वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना धनकवडीतील गुलाबनगर परिसरात घडली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. निशांत मुकुंद पिसे (वय ४६, रा. सुवर्णा हाईट्स, तळजाई पठार, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी समाधान प्रभू पवार (वय ४२, रा. नवजीवन मित्र मंडळ, आंबेगाव पठार, धनकवडी ) याला अटक करण्यात आली. याबाबत मुकुंद पिसे (वय ७८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Taloja Firing Case: तळोजा गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी पुण्यातून ताब्यात; आंबेगाव पोलिसांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकुंद पिसे हे वकील आहेत. त्यांचा मुलगा निशांत यांचा आरोपी समाधान याच्याशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. आराेपीचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. २२ ऑक्टोबर रोजी निशांत हा धनकवडीतील गुलाबनगर परिसरातून निघाला होता. आरोपीने निशांत यांच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात निशा्ंत गंभीर जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक मिठारे तपास करत आहेत.
Ans: भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्यावरून आरोपी आणि तक्रारदार यांच्यात वाद झाला होता.
Ans: तक्रारदार तरुण आणि त्याची पत्नी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि पाठलाग करून मारहाण केली.
Ans: मुंढवा पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघा आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






