Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: संतापजनक! चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; ‘घरी सोडतो’ म्हणत कारमध्ये नेलं अन् अत्याचार;

पुण्यातील मुंडवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हॉटेलमधील पार्टीत ओळख झालेल्या व्यक्तीने ‘घरी सोडतो’ असे सांगून महिलेला कारमध्ये नेले आणि अत्याचार केला. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 19, 2026 | 07:50 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • पार्टीत ओळख झालेल्या व्यक्तीवर महिलेवरील अत्याचाराचा आरोप
  • मुंडवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर चालत्या कारमध्ये घडला प्रकार
  • कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू
पुणे: पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घडलेली घटना पुण्यातील मुंडवा कोरेगाव पार्क रस्त्यावरती घडली. कोरेगाव पार्क पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

मध्यरात्री एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी पीडित महिला गेली होती. तिथे तिची ओळख आरोपी पुरुषाशी झाली. त्याने घरी सोडतो म्हणून कार मध्ये नेलं आणि तिच्यावरती अत्याचार केला. धावत्या कार मध्ये त्या व्यक्तीने महिलांवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेल मधून पीडित महिला आणि पुरुष सोबतच बाहेर पडले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अशा घटना राज्यात शहरात वारंवार घडत आहेत. यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही का असा सवाल नागरिक विचारत आहेत.

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज ते नवले ब्रिजदरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून, ते व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर चौक येथे सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रवासी भरण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादाच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तीन आरोपींनी त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून मारहाण केली. हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. आरोपींच्या शोधासाठी भोर आणि वेल्हा परिसरातही पोलिसांची पथके पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील मुंडवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर घडली.

  • Que: आरोपीची महिलेशी ओळख कशी झाली?

    Ans: मध्यरात्री हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान आरोपीची महिलेशी ओळख झाली होती.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune crime outrageous woman sexually assaulted inside a moving car lured into the vehicle with the promise of a ride home then assaulted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 07:50 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
1

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…
2

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.