पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरच्यांनी लग्नाची बोलणी सुरु होती त्याचवेळी तरुण आणि तरुणी या दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर ते दोघे फिरायला गेले आणि त्याचवेळी दोघांमध्ये शरीर संबंध निर्माण झाले. मात्र दोघांच्या घरच्यांची लग्नाची बोलणी फिसकटली आणि लग्न मोडलं. त्यांनतर तरुणीचं लग्न तिच्या घरच्यांनी दुसऱ्या मुलासोबत ठरवलं. याची माहिती तरुणाला समजताच तरुणाने त्या तरुणीला ब्लॅकमेल करायला आणि त्रास द्यायला सुरुवात केली.
Kalyan Crime : कामगाराला मारहाण केली अन्… ; दुचाकी घेऊन पळून जाणारा चोर जेरबंद
त्याने दोघांमध्ये झालेल्या शरीर संबंध आणि दोघांचे त्याने बनवलेले व्हिडीओ लग्न ठरलेल्या मुलाला आणि तिला दाखवले. त्यानंतर तरुणीचं जुळलेलं लग्न मोडलं. याप्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विनयभंग, बदनामी, छेडछाड आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुण यांची पूर्वी लग्नासाठी बोलणी सुरु होती. त्यावेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि फिरायला गेल्यावर त्यांच्या परस्पर संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र नांतर काही कारणांमुळे हे नातं तुटलं आणि तरुणीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरलं.
ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित आरोपीने ज्या ठिकाणी लग्न ठरलं त्या वराला भेट घेतली आणि त्याच्यासमोर तरुणीसोबत गुपचूप चित्रीकरण केलेले शारीरिक संबंधाचे व्हिडीओ दाखवले. हे पाहून त्या तरुणाने त्यांचं जुळलेलं लग्न तातडीने मोडलं. तरुणीने यानंतर थेट सिंहगड रोड पोलीस ठाणे गाठलं. तिने आपल्या तक्रारीत सांगितले की, आरोपीने विश्वासघात केला आहे. तिच्या संमतीशिवाय व्हिडीओ चित्रीकरण केले. त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि समाजात तिची बदनामी केली. यासोबतच लग्न मोडण्यासाठी पद्धतशीरपणे कट रचल्याचा आरोपही तिने केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.