इंदूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. बसचा तयार फुटल्यानंतर अचानक बसला आग लागली. यावेळी बसमध्ये एकूण ३९ प्रवासी होते. ही दुर्घटना मुंबई आग्रा रोडवरील आडगाव येथील हॉटेल स्वागत समोर सकाळी ६ ते 6.30 च्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे.
पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला
आग लागल्याच्या लक्षात येताच सोमा टोलच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आली आहे. सोमा टोलच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आज आटोक्यात आणली. घटनास्थळावरील पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी. सोमा टोलचे कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाश्यांना बाहेर काढलं आहे. वेळेत सर्व प्रवाश्यांना बाहेर काढण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व ३९ प्रवासी सुखरूप आहेत, कोणालाही इजा झालेली नाही. परंतु या सर्व प्रवाश्यांचे सर्व सामान जाळून खाक झाला आहे.
घरात एकटं असतांना पोलीस हवालदाराने संपवले आयुष्य, एकटेपणा आणि आजारापासून त्रस्त
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत न्यू पोलीस वसाहतीमध्ये एका पोलीस हवालदारने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारे हवालदार मरोळ एल (LA) मध्ये कार्यरत होते. मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून मरोळ LA मध्ये नोकरीपासून पोलीस हवालदार गैरहजर होते.त्यांना तीन महिन्यापासून काविळीचा आजार होता. त्यांचा या आजारावर उपचार सुरू होता. या उपचारादरम्यान त्यांची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्यामुळे पोलीस हवालदार तणावात होते. मागितलं तीन ते साडेतीन महिन्यापासून मरोळ LA मध्ये देखील नोकरीपासून पोलीस हवालदार गैरहजर होते.
त्यांची पत्नी मुलं नसल्यामुळे आणि आजारांपासून ते ट्रस्ट असल्याने पोलीस हवालदाराने काल आपल्या घरामध्ये पंख्यामधून गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पोलीस हवालदार यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. आजरापासून तणावात आणि कुटुंबासोबत नसल्याच्या तणावातून आत्महत्या करत आहेत असं लिहून आत्महत्या केली. सध्या अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल करून पोलीस हवलदार ने टोकाचा पाऊल का उचलला ? या संदर्भात अधिक तपास करत आहे.
Jharkhand Crime : नवऱ्याची रोज कटकट, संतापलेल्या बायकोने प्रायव्हेट पार्टच टाकला कापून आणि नंतर…