शालेय मुलींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा धक्कादायक प्रकार (फोटो- istockphoto /टीम नवराष्ट्र)
पुणे: पुण्यातील पाषाण भागातील एका नामांकित शाळेच्या चेंजिग रूममध्ये मोबाईल ठेवून कपडे बदलतानाचे रेकॉर्डिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील शिपायाने हा प्रकार केला असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने शहरात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिपाई तुषार सरोदे (वय २९) याला अटक केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत पोक्सो सह बी.एन.एस कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पाषाण परिसरात ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. तुषार त्याठिकाणी शिपाई आहे. ६ जानेवारी रोजी खेळाचा तास संपल्यानंतर विद्यार्थिनी किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे उभा होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले, तो गेला परंतु, त्याने मोबाईल तिथेच ठेवून त्याचे रेकॉर्डिंग सुरू केले. मोबाईल देखील त्याने एका स्विच बोर्डवर ठेवला होता.
परंतु, काही वेळातच विद्यार्थिनींच्या हा प्रकार लक्षात आला. तात्काळ त्यांनी मोबाईल ताब्यात घेऊन त्यातून व्हिडीओ डिलीट केला. घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितला. पालकांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेऊन घटनेबाबत माहिती दिली. सरोदेला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला, मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदेकडे चौकशी केली. त्याने त्याने कबूली दिली. नंतर शाळेच्या व्याव्यस्थापान ने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सरोदेला अटक केली.
पोलिस पाटलाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
सिंदेवाही तालुक्यातील देवाडा येथील पोलिस पाटलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि.5) घडली. अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलासह पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली असून, यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मुकेश काशीनाथ पेटकुले (28 रा. देवाडा) असे आरोपी पोलिस पाटलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.5) अल्पवयीन मुलगी शाळेचा कार्यक्रम असल्याने गावातील तिची वर्गमैत्रीण मिळून सकाळी कार्यक्रमाला हजर झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास शाळेचा कार्यक्रम संपन्न झाल्याने दोघेही सिंदेवाही येथून बसने देवाडाकरिता निघाले. देवाडा गावच्या बसस्थानकावर उतरल्यानंतर काही वेळात मुलींना गावातील पोलिस पाटील मुकेश पेटकुले याने आपल्या दुचाकीने आल्याचे दिसले. बस स्थानकापासून गाव काही अंतरावर असल्याने मुलींनी पोलिस पाटील पेटकुले याच्यावर विश्वास ठेऊन गावात सोडून द्यावे, अशी विनंती केली.
हेही वाचा: पोलिस पाटलाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ‘ती’ विनंती ठरली कारणीभूत
पेटकुले याने होय सोडून देतो म्हणून दोन्ही मुलींना आपल्या दुचाकीवर बसवले. फिर्यादी मुलीला सिंदेवाहीला घेऊन जातो आणि तिच्या वर्गमैत्रीणींना बसस्थानकावर ठेवतो, असे बोलू लागल्याने फिर्यादी मुलीने येण्यास नकार दिला. तरीसुद्धा आरोपी पेटकुले आग्रह करत होता. काही अंतरावर दोन्ही मुलींनी पेटकुले याला दुचाकी थांबविण्यास सांगितले आणि दोन्ही मुली दुचाकीवरुन उतरून पायी-पायी गावाच्या दिशेने निघाल्या.






