अनैतिक संबधातून पत्नीने पोलीस पतीला संपवलं; पण एक व्यवहार अन् भांडं फूटलं? असं उलगडलं हत्येचं गूढ
पुणे: शेजारील व्यक्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याची संधी साधून दोन अल्पवयीन मुलांनी बंद घरफोडून दागिन्यांसह ९० हजारांचा ऐवज चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना सहकारनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तळजाई वसाहत भागात घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय दोन मुलांना पकडण्यात आले आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे, सहाय्यक निरीक्षक सागर पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे. पंधरा दिवसांपुर्वी (दि. ९ डिसेंबर) रोजी तळजाई वसाहत भागात घरफोडीची घटना घडली होती. संबंधित व्यक्ती आजारी होता. त्यामुळे तो रुग्णालयात अॅडमिट होता. ही माहिती या मुलांना माहिती होती. ही संधी साधत अज्ञातांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, घरातील कपाटातून सोन्या – चांदीचे दागिने चोरून नेले होते. सहकारनगर पोलीस आरोपींचा शोध घेत होते.
तळजाई परिसर तसेच इतर भागातील तांत्रिक तपास केला. या दरम्यान गुन्ह्यातील संशयीत हे तळजाई भागातील बदाम चौकात असल्याची माहिती पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना मिळाली. त्यानूसार वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांच्या सूचनेप्रमाणे पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत ते अल्पवयीन असल्याचे समोर आले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या दागिन्यासह ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा: महाराष्ट्र हादरला! मद्यधुंद पोलिसाचा 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, घटनेने संताप
मद्यधुंद पोलिसाचा 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार
मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरात आई- वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 25) घडली. सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या आरोपी पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.