Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून सापळा रचून पकडले

बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2025 | 10:57 AM
पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना ठोकल्या बेड्या; पुण्यातील 'या' भागातून सापळा रचून पकडले

पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना ठोकल्या बेड्या; पुण्यातील 'या' भागातून सापळा रचून पकडले

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले आहे. गणेश गौतम वाघमारे (वय २८), तेजस काशीनाथ शेलार (वय २५, दोघे रा. सर्व्हे क्रमांक १३०, दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक अस्मिता लाड, राजेंद्र लांडगे, मयूर भोकरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

वाघमारे आणि शेलार हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाघमारे याच्यावर पर्वती पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत तो जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडला आहे. वाघमारे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, तो दांडेकर पूल भागात दहशत माजवित असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे, पोलीस शिपाई अमर पवार, मयूर भोकरे यांना बातमीदाराने दिली होती. नंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाघमारे याला पकडले.

वाघमारे याच्याकडे पिस्तुलाबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा माझ्याकडे पिस्तूल आहे. मात्र, ते शेलार याने विकत घेतल्याची माहिती त्याने दिली. प्रतिस्पर्धी टोळीकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने दोघे पिस्तूल बाळगत असल्याची, माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शेलारला ताब्यात घेतले. शेलार याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली. दोघांवर पर्वती पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडीपार गुंडांना पकडले

खंडणी विरोधी पथकाने दुसऱ्या कारवाईत शहरातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना पकडले आहे. प्रथम उर्फ पॅडी सुरेश म्हस्के (वय २०, रा. दांडेकर पूल), रोशन अविनाश काकडे (वय २४, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे अहोत. म्हस्के आणि काकडे यांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून सिंहगड रस्ता पोलिसांनी तडीपार केले होते. तडीपार केल्यानंतर दोघेजण शहरात वास्तव्यास असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली.

Web Title: Pune police arrests criminals carrying pistols

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Arrested News
  • cmomaharashtra
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
1

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
2

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
3

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.